पाठ्यपुस्तकात येणार पुनीत राजकुमारच्या जीवनावर आधारित धडा, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय

दाक्षिणात्य सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या (puneeth rajkumar) मृत्यूने देशभरातील मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. पुनीत राजकुमार हा कन्नड सिनेसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेता म्हणून प्रसिद्ध होता. २९ ऑक्टोंबर २०२१ ला ह्रदयविकाराच्या झटक्याने पुनीतचे निधन झाले. या बातमीने त्याच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. संपुर्ण चित्रपट जगतातून अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात होती. आता पुनीत राजकुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. कर्नाटक सरकारने पुनीतच्या जीवनावरील एक धडा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ठ करण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीने पुनीतच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

पुनीत राजकुमार हा कन्नड सिनेसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या दमदार अभिनयाचे आणि चित्रपटांचे असंख्य चाहते देशभरात आहेत. फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे, तर पुनीतची एकूणच सामाजिक क्षेत्रातही प्रतिष्ठित व्यक्ती अशी ओळख होती. त्याच्या निधनाने देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. पुनीतच्या मृत्यूच्या बातमीने त्याच्या काही चाहत्यांनीही आत्महत्या केली होती.इतकी त्याची लोकप्रियता अफाट होती. यामुळेच पुनीत राजकुमारच्या लोकप्रियतेचा विचार करत, त्याचा अपेक्षित सन्मान करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने त्याच्या आयुष्यातील घटनेचा किंवा गोष्टीचा राज्याच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसली तरी यासंबंधीचे निवेदन भाजपा जिल्हाध्यक्ष  एन.आर. रमेश यांनी राज्याचे शिक्षणमंत्र्याना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

दरम्यान चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या पुनीतचे सामाजिक क्षेत्रातही बहुमोल योगदान होते. पुनीतने २६ अनाथाश्रम, १९ गौशाळा, १६ वृद्धाश्रमे तयार केली होती. ज्याचा संपुर्ण खर्च तो स्वत: करत होता. सगळ्यात महत्वाचे म्हणजे याबाबत कधीही त्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी माहिती दिली नव्हती. या सगळ्या बातम्या त्याच्या मृत्यूनंतर समोर आल्या होत्या. आपल्या दिलदार आणि सहृदयी वृत्तीमुळे तो प्रत्येकाच्या मनात बसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post