नजरेच्या एका कटाक्षाने सर्वांना घायाळ करणाऱ्या प्रिया वारियरचे बोल्ड फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस


नजरेच्या एका कटाक्षाने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर तर सर्वांनाच आठवतच असेल, नाही का? तिच्या एका व्हिडिओने समस्त तरुण वर्गाला वेड लावले होते. सोशल मीडियावर तर तिला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. तिची फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त आहे. नुकतेच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. या फोटोमध्ये ती खूप बोल्ड आणि स्टनिंग दिसत आहे. हे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा या फोटोतील अंदाज खूपच आवडला आहे. या फोटोवर  नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. (Priya prakash varrier’s latest photo viral on social media)

प्रियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिच्या चेहऱ्यावर तिचे केस आले आहेत. त्यात ती खूपच बोल्ड दिसत आहे. चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. काहींनी ‘प्रेम’ असे लिहिले आहे, तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. फोटोवर ५०० पेक्षा अधिक कमेंट्स आल्या आहेत.

प्रिया ही केवळ 21 वर्षाची आहे. ती एक अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल आहे. तिने मल्याळम, तेलुगू चित्रपटात काम केले आहे. 2018 मध्ये तिचा डोळा मारल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामुळे ती रातोरात प्रसिद्ध झाली होती.

याआधी एकदा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये ती चित्रपटाच्या सेटवर जोरात खाली पडताना दिसत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, यामुळे तिच्या डोक्याला जखम देखील झाली होती. या व्हिडिओमध्ये सीनच्या आधी अभिनेत्याचा प्रवेश होतो. त्यानंतर त्याच्या मागून प्रिया येते. ती त्याच्या खांद्याला लटकायचा प्रयत्न करत असते. परंतु ती त्याला नीट पकडू शकत नाही आणि खाली पडते. हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता.

या आधी देखील प्रियाचे अनेक हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.