खरंच! शाहरुख खानकडे नाही काम? ट्वीट करत आलियाला म्हणाला, ‘प्लिज मला चित्रपटात घे, वचन देतो…’


चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हे अभिनयासोबतच अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचे नशीब अजमावत असतात. कदाचित कलाकारांचा हा बॅकअप प्लॅन देखील असावा. असो, तर काही कलाकार हे अभिनयासोबतच हॉटेल व्यवसायात कार्यरत असतात, काही कलाकार फिटनेस क्षेत्रात कार्यरत असतात, तर काही कलाकार दिग्दर्शक बनतात किंवा प्रॉडक्शन हाऊस सुरू करतात. अशा कलाकारांची यादी भरपूर मोठी आहे. यात आता बॉलिवूडची बबली आणि क्यूट गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलिया भट्टचा देखील समावेश झाला आहे.

आलियाने नुकतेच तिचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले असून, या प्रॉडक्शन हाऊसमध्ये तयार होणाऱ्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू केले आहे. आलियाच्या या चित्रपटाचे नाव असणार ‘डार्लिंगस’ आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आलिया एक निर्माती म्हणून पदार्पण करणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर आलियाने या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. याची माहिती देताना तिने एक ट्वीट केले असून, तिच्या या ट्विटला शाहरुख खानने जे उत्तर दिले आहे ते उत्तर ते ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

त्याचे झाले असे की, आलियाने तिच्या नवीन प्रॉडक्शन हाऊसबद्दल आणि चित्रपटाबद्दल माहिती देणारे एक ट्वीट केले. त्यात तिने लिहिले की, “एक निर्माता म्हणून माझा पहिला चित्रपट. मात्र, मी नेहमीच एक अभिनेत्री असेल, या क्षणी मी एक नर्व्हस कलाकार आहे. मला माहिती नाही की, हे काय आहे. नवीन सिनेमा सुरू होण्याआधीची रात्र. मला माझ्या संपूर्ण शरीरात नर्व्हस भावना जाणवत आहे. सेटवर येऊन मी खूपच आनंदित आणि उत्साहित आहे. या चित्रपटाला घेऊन मी मागील काही काळापासून खूपच उत्साहित आहे. मला सर्वांनी शुभेच्छा द्या, कारण मला माझे सहकलाकार असणाऱ्या विजय वर्मा आणि शेफाली शाह या प्रतिभेसोबत काम करता यावे.”

आलियाच्या या ट्विटला उत्तर देताना शाहरुख खानने लिहिले, “या निर्मितीनंतर तुझ्या पुढच्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटासाठी कृपया मला साईन कर. मी शूटिंगला वेळेत येईल आणि खूप प्रोफेशनली काम करेल वचन देतो.”

शाहरुखच्या या ट्विटला उत्तर देताना आलिया म्हणाली, “हाहाहा…मी यापेक्षा जास्त अजून काहीच मागू शकत नाही…डील पक्की, तुमाला मी साईन केले. माझ्या आवडत्या कलाकाराला खूप प्रेम.”

आलिया ‘डार्लिंग’ या सिनेमाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊससोबत मिळून करत आहे. ‘डार्लिंग’ या सिनेमात एका आई आणि मुलीची गोष्ट दाखवली जाणार असून, त्या मायलेकी आयुष्यात त्यांची जागा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितीमधून जातात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.