Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम प्रियदर्शनी इंदलकरने खरेदी केला आलिशान कार, चाहत्यांनी केली ‘ही’ मागणी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम प्रियदर्शनी इंदलकरने खरेदी केला आलिशान कार, चाहत्यांनी केली ‘ही’ मागणी

महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या शो मधील कलाकार प्रेक्षकांना खळखलून हसवण्याचे काम करत असतात. हा शो नेहमीच चर्तेत असतो. या शो मधील कलाकारांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केले आहे. या शोमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने तिच्या चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. प्रियदर्शनीने एक नवीन कार खरेदी केली आहे. यादरम्यान तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रियदर्शनी इंदलकर झाली इग्निस कारची मालकीण
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) हिने स्वत:लाच एक लग्झरी कार गिफ्ट केली आहे. प्रियदर्शनी इंदलकर इग्निस कारची मालकीण बनली आहे. तिने मारुती सुझुकी कंपीनीची इग्निसचे नवीन मॉडेल खरेदी केले आहे. यादरम्यानचे काही फोटो समोर आले आहे. या फोटोमध्ये ती कारची पूजा करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ती कारच्या शेजारी उभा असलेली दिसत आहे. काही फोटोमध्ये ती गाडीत बसलेली दिसत आहे.

प्रियदर्शनी इंदलकरने पोस्ट करताना लिहिले की, “New member added to the family ! वाढदिवसाला अनेकांनी विश केलं, “तुझी स्वप्न पूर्ण होवोत”… त्या सर्वांना ‘Thank you’ आणि माझ्यासोबत माझ्या आनंदात नाचणाऱ्या सर्वांचेही तितकेच अभिनंदन. या सगळ्या फोटोंमध्ये आनंद ओसांडुन वाहतोय पण Number 7 … IS THE WINNER !” ; तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

 प्रियदर्शनी इंदलकरच्या या कारची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “एक राऊंड द्याल का?” तर काहीनीं तिचे अभिनंदन केले आहे. तर एकाने मजेशीर कमेंट केली आहे. त्याने लिहिले की, “तुझं खरं सौंदर्य…पण तुझ्या गाडीच प्लास्टिकच सौंदर्य आहे…जशी गालावर खळी पडते ना तुझ्या …. तशीच खळी थोडा जरी धक्का लागला ना तर गाडी वर पडेन..” (Priyadarshini Indalkar of Maharashtrachi Hasyajatra Fair fame bought a luxury car)

अधिक वाचा- 
मोठी बातमी! अभिनेत्री प्रीती झिंटावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळचा प्रिय व्यक्ती हरपला
एकदम परफेक्ट, पूजा सावंतच्या ‘या’ लुकची सर्वत्र चर्चा, पहा फोटो

हे देखील वाचा