Tuesday, April 23, 2024

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, युजर म्हणाले, “तुझीही वेळ येईल आणि…”

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रम महाराष्ट्रभरातील लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. या कार्यक्रमामध्ये काम करणारा प्रत्येक अभिनेता प्रेक्षकांना अगदी प्रत्येकाला खळखळून हसायला भाग पाडत असतो. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे निखिल बने होय. निखिल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे सतत चर्चेत येत असतो. अगदी सामान्य कुटुंबातील हा मुलगा आहे. तो आज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

निखिलचा (Nikhil Bane) स्वतंत्र असा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तसेच या शोमध्ये जुने नावाजलेले कलाकार आहे. त्यात काही नवोदित देखील कलाकार देखील आहेत. ज्यांना प्रेक्षक भरपूर प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे. निखिल युट्युबवर ब्लाॅगदेखील बनवतो. सोशल मीडियावर बनेचा मोठी फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवरही तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. सध्या सोशल मीडियावर निखिलचा एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे.

निखिल चाळ संस्कृतीमध्ये राहतो. हि गोष्ट सांगताना त्याला कधीच कमीपणा वाटत नाही. निखिल चाळीतील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच त्याने चाळीतील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निखिलचे काही मित्र दिसत आहेत. निखिलने मित्रांच्या मदतीने त्याच्या घराच्या पत्र्यावर ताडपत्री टाकली आहे. त्याच वेळीचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केल आहे.

निखिलच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांसह कलाकार मंडळींनीही लाईक आणि कमेंट वर्षीव केला आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी, पल्लवी पाटील, ऋतुजा बागवे यांसारख्या अनेक कलाकारांनी निखिलच्या या व्हिडीओवर भन्नाट कमेंट केली आहेत. एका युजरने लिहिले की, “भाई टेन्शन नको घेऊ. तुझीही वेळ येईल. एक दिवस हेच मित्र तुझ्या घराच्या टेरेसवर तुझ्यासोबत पार्टी करताना दिसतील”. निखिलच्या चाहत्यांने केलेल्या या कमेंटला निखिलने रिप्लाय दिला आहे. रिप्लाय देताना त्याने हार्ट इमोजी शेअर केली आहे. सध्या निखिलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. (The video social media see details of maharashtrachi-hasyajatra fame Nikhil Bane in Chali is viral)

अधिक वाचा- 
श्रद्धा कपूर ऑटोरिक्षाने पोहोचली जिममध्ये; युजर्स म्हणाले, ‘डाउन टू अर्थ म्हणजे श्रद्धा’
कंगणाने ‘टिकू वेड्स शेरू’ मधलं पहिलं गाणं केलं रिलीज, अवनीतला रिव्हिलिंग ड्रेसमध्ये पाहून चाहते थक्क

हे देखील वाचा