Monday, October 2, 2023

मोठी बातमी! अभिनेत्री प्रीती झिंटावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळचा प्रिय व्यक्ती हरपला

अभिनेत्री प्रीती झिंटाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री प्रीतीचे सासरे जॉन स्विंडल यांचे दु:खत निधन झाले आहे. एक अभिनेत्री, निर्माती, लेखक आणि क्रिकेट संघाची मालकीण असलेल्या प्रीतीने लॉस एंजेलिसमध्ये जीन गुडइनफशी लग्न केले. अभिनेत्री प्रीतीने सोशल मीडियावर सासरच्या मृत्यूची बातमी दिली आहे.

प्रीतीने (Preity Zinta) सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. प्रिती झिंटाने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या सासऱ्यासोबत दिसत आहे. प्रीती झिंटा अनेकदा तिच्या फॅन्ससोबत तिच्या कुटुंबाची आणि सासरची झलक शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी, अभिनेत्रीने तिचे सासरे जॉन स्विंडलसोबत इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता.

प्रितीने पोस्ट करताना कॅप्शमध्ये लिहिले की, “प्रिय जॉन, मला तुमच्या दयाळूपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझ्या समजूतदारपणाची आठवण होईल. मला तुमच्यासोबत शूटला जाणे, तुमचे आवडते भारतीय पदार्थ शिजवणे आणि प्रत्येक गोष्टीबद्दल गप्पा मारणे खूप आवडायचे.” ‘

तिने पुढे लिहिले की, ” माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी तुम्ही तुमच्या घराचं आणि मनाचं दार मोठ्या मनाने उघडलं, याकरिता तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्या जाण्यामुळे आता घरातलं वातावरण कधीच पहिल्यासारखं होणार नाही. मला विश्वास आहे की, तुम्ही एका योग्य ठिकाणी आनंदी राहताल, पण मला आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तीना तुमची सतत आठवण येत राहील. तुमच्या आत्मास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.”

प्रीती झिंटाने अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. पण ती बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये दिसते. अलीकडेच ती सलमान खानची बहीण अर्पिताच्या ईद पार्टीत स्पॉट झाली होती. तर अभिनेत्री काही महिन्यांपूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतात आली होती.प्रीतीनं जीन गुडइनफबरोबर लग्न केल्यानंतर ती लॉस एंजेलिसला राहत होती. 2021मध्ये सरोगसी प्रक्रियेद्वारे प्रीती आई झाली आहे. तिला आता दोन जुळी मुलं आहेत. (Actress Preity Zinta father-in-law passes away)

अधिक वाचा- 
त्याच्या थोबाडीत द्या! धर्म काढत शिक्षिकेची पोरांना सूचना; अभिनेत्री म्हणाली, ‘शिक्षा व्हावी आणि…’
इंजिनिअरिंग सोडून अभिनयात आली, अभिनेत्री सुचित्रा पल्लईचा सिनेसृष्टीचा प्रवास वाचून व्हाल थक्क

 

हे देखील वाचा