Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रियांका चोप्रा फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ सिनेमासाठी सर्वात जास्त उत्सुक

बॉलीवूड आणि हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही काळापासून सतत हॉलीवूडच्या विविध प्रोजेक्टच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तिचा हॉलीवूड मधील चित्रपट ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. आज काल ती त्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्राने तिच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आहेत आणि त्या चित्रपटाबद्दल ती खूप उत्सुक असल्याचे देखील सांगितले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार असून, तिला या चित्रपटात जबरदस्त डान्स करण्याची संधी देखील मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका चोप्रा फरहान अख्तरला म्हणाली की, “मला चित्रपटांमध्ये हिंदी बोलून खूप काळ झाला आहे. मला हिंदी चित्रपटात काम करायचे आहे, आणि त्याच बरोबर मला डान्स देखील करायचा आहे. म्हणून या चित्रपटात माझा डान्स देखील झाला पाहिजे. ‘जी ले जरा’ या चित्रपटाची शूटिंग २०२२ मध्ये सुरु होणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा त्याचबरोबर आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

प्रियांका चोप्राने कीनू रीव्स आणि कैरी-एन मॉस च्या सोबत ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शस’ या चित्रपटात सीताच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक लाना वाकोवस्की हे असून, हा चित्रपट भारतात सुद्धा प्रदर्शित केला जाणार आहे. प्रियांका चोप्रा म्हणाली की लोकांवरती विश्वास ठेवायला खूप काळ लागतो. मी जवळपास सात वर्षांपासून हॉलीवूड मध्ये काम करत आहे. ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शस’ सारख्या चित्रपटात काम करणे म्हणजे माझ्यासाठी एक रोमांचक अनुभव होता. प्रियांकाचा शेवटचा हिंदी सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘द व्हाईट टायगर’ होता. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव देखील झळकला होता.

हेही वाचा-

सलमान खानने शेअर केलेल्या शर्टलेस फोटोवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने केलेली कमेंट झाली व्हायरल

बर्थडे गर्ल करिश्मा शर्माचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

‘भाबीजी घर पर हैं’ मधील ‘या’ अभिनेत्याने केले बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम, ‘या’ मालिकेने बदलवले आयुष्य

हे देखील वाचा