Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड वाढदिवस विशेष: निक जोनासपूर्वी ‘हा’ हॉलिवूड स्टार होता प्रियांका चोप्राच्या प्रेमात

वाढदिवस विशेष: निक जोनासपूर्वी ‘हा’ हॉलिवूड स्टार होता प्रियांका चोप्राच्या प्रेमात

प्रियांका चोप्राचे (Priyanka Chopra) जगभरात लाखो चाहते आहेत. २०१८ मध्ये तिने निक जोनाससोबत (Nick Jonas) लग्न करून अनेक चाहत्यांची मनं मोडली. पण निकच्या आधी आणखी एक परदेशी कलाकार होता, जो प्रियांकावर मनापासून प्रेम करत होता आणि त्याला तिच्याशी लग्नही करायचं होतं. या अभिनेत्याचं नाव आहे गेरार्ड बटलर (Gerard Butler).

प्रियांकावर प्रभावित झाला गेरार्ड बटलर
हॉलिवूडचा सुपरस्टार गेरार्ड बटलर त्याच्या रोमँटिक इमेजमुळे खूप लोकप्रिय आहे. ‘पीएस आय लव्ह यू’ आणि ‘डियर फ्रँकी’ सारख्या चित्रपटांच्या मदतीने त्याने आपली फिमेल फॉलोविंग खूप वाढवली आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, बटलर एकेकाळी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या प्रेमात पडला होता. खरं तर बटलर २००९ मध्ये भारतात आला होता. त्यावेळी प्रियांका चोप्राने तिच्या वर्सोव्यातील घरात बटलरसाठी पार्टी आयोजित केली होती. गेरार्ड प्रियांकावर खूप प्रभावित झाला होता आणि त्याने प्रियांकाला लग्नासाठी प्रपोजही केले होते. (priyanka chopra gerard butler story hollywood actor gerard butler loved priyanka chopra)

पुन्हा पुन्हा प्रपोज करत होता बटलर
काही रिपोर्ट्सनुसार, तो पुन्हा पुन्हा गुडघ्यावर बसून प्रियांकाला प्रपोज करून इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होता. तिथे उपस्थित असलेल्या एका गेस्टने सांगितले की, तो दर अर्ध्या तासाने हे करत होता आणि लोकांना तो एक विनोद वाटत होता. दर अर्ध्या तासाने बटलर तिला प्रपोज करायचा आणि प्रियांका त्याच्या या कृतीवर हसायची.

बटलरला हवी होती प्रियांका
साल २०१२ मध्ये बटलरने प्रियांकावर प्रेमही व्यक्त केले होते. त्याने मुलाखतीत सांगितले होते की, “गेल्या वर्षी प्रियांका इथे आली होती आणि मी एका लग्नासाठी बाहेरगावी गेलो होतो.” तो पुढे म्हणाला की, “मला तिला भेटायचे होते, म्हणून मी फ्लाईट सोडायचा विचारही करत होतो.” मी अविवाहित आहे कारण मी प्रियांका चोप्राची वाट पाहत आहे, असेही तो म्हणाला.

आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत प्रियांका आणि बटलर
बटलर आणि प्रियांका यांच्यात काहीही होऊ शकले नाही आणि दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. बटलर बऱ्याच काळापासून मॉर्गन ब्राउनला डेट करत असताना, प्रियांका चोप्राने २०१८ मध्ये गायक निक जोनासशी लग्न केले. तसेच, या वर्षी प्रियांकाने सरोगसीच्या मदतीने एका मुलीला जन्म दिला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा