अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) बॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री आहे, जिने हॉलिवूडमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. आज ती देश-विदेशात मोठे नाव बनली आहे. प्रियांका आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये क्वचितच दिसली आहे. पण तिचे चित्रपट कोणीही विसरू शकत नाही. प्रियांकाने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले असून, तिने आपल्या कामाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. आजच्या काळात ती ग्लोबल स्टार आहे. मात्र आता तिची एक चूक सगळ्या जगाला दिसत आहे. ग्लोबल स्टार असल्याने अभिनेत्रीही तिच्या स्टाईलची खूप काळजी घेते. पण कधी कधी ती Oops Momentची शिकारही होते.
प्रियांका निकची जोडी
बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियांकाच्या फॅन फॉलोविंगबद्दल बोलायचे, तर जगभरातील लोक तिला पसंत करत आहेत. तिने २०१८ साली परदेशी गायक निक जोनाससोबत (Nick Jonas) लग्न केले होते. त्या दोघांच्या लग्नाने चांगल्याच चर्चा रंगवल्या होत्या. जगभरातील सर्व प्लॅटफॉर्मवर लग्नानंतर प्रियांका आणि निकचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. अनेकवेळा ती तिच्या नवऱ्यासमोर ऊप्स मूमेंटची शिकार झाली आहे.
प्रियांका झाली उप्स मोमेंटची शिकार
व्हायरल होत असलेला प्रियांका चोप्राचा व्हिडिओ एका लाईव्ह सेशनचा आहे. खरं तर, हा व्हिडिओ बराच जुना असल्याचं बोललं जात आहे. हाच व्हिडिओ दोघांच्या लाइव्ह चॅटच्या माध्यमातून समोर आला आहे आणि दोघांनीही आपल्या चाहत्यांना त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आयसोलेशनमध्ये होते. तिच्या पतीच्या या लाइव्ह व्हिडिओमध्ये दोघांनीही खूप रोमँटिक क्षण शेअर केले आहेत आणि यादरम्यान प्रियांका चोप्राने सूट घातला होता. मात्र असाच काहीसा प्रकार समोर आला जेव्हा प्रियांका चोप्राला ऊप्स मोमेंटची शिकार व्हावे लागले.
प्रियांका चोप्रा तिच्या पतीची किस घ्यायचा विचार करू लागते, यादरम्यान अचानक तिच्या टॉपचा साइड कट खूप पुढे जातो आणि प्रियांकामध्ये अडकते. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर प्रियांका ॲमेझॉन प्राइमच्या ‘सिटाडेल’ या सीरिजसाठी शूटिंग करत आहे. ही अभिनेत्री ‘द मॅट्रिक्स ४’मध्ये दिसली होती आणि ‘टेक्स्ट फॉर यू’मध्येही ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
प्रियांका चोप्राने निक जोनास दोघेही लॉस एंजेलिसमध्ये त्यांच्या पॉश निवासस्थानी राहतात. प्रियांका चोप्रा अमेरिकेतही तिच्या इंस्टाग्रामवर भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे पालन करताना दिसते. त्याचबरोबर प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास २१ जानेवारी रोजी सरोगसीद्वारे पालक बनले आहेत. या जोडप्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना याबद्दल माहिती दिली होती. प्रियांका मातृत्वाचा आनंद घेत आहे.
हेही वाचा –
- राणी चॅटर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मिळाला पुरस्कार, बांगड्या-बिंदीने बनवला अभिनेत्रीने पारंपारिक लूक
- टेलिव्हिजन रियॅलिटी शो स्मार्ट जोडी मधील ‘या’ सेलिब्रिटी जोडीला मिळते सर्वात जास्त मानधन
- जेव्हा लोक रेमो डिसूझाला ‘कालिया’ म्हणायचे तेव्हा यायचा खूप राग, आईच्या ‘या’ गोष्टीने बदलली विचारसरणी