‘देसी गर्ल’ प्रियांकाने मिळवले इंस्टाग्राम रिचलिस्टमध्ये स्थान; एका पोस्टसाठी घेते तब्बल ‘इतके’ कोटी रुपये


बॉलिवूडमधील ‘देसी गर्ल’ म्हणजेच प्रियांका चोप्रा ही आज एक ग्लोबल स्टार बनली आहे. अवघ्या कमी कालावधीत तिने बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंतचा हा प्रवास पार केला आहे. एक लोकप्रिय कलाकार म्हणून प्रियांकाचे सोशल मीडिया खूप फॅन फॉलोवर्स आहेत. प्रियांकाला याचा फायदा ऍड फिल्मपासून ते सोशल मीडिया पोस्टपर्यंत सगळीकडे होतो. प्रियांका चोप्रा तिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टसाठी खूप रक्कम घेते. नुकतेच इंस्टाग्राम रिचलिस्ट 2021 समोर आली आहे. यामध्ये भारतातील केवळ दोनच व्यक्ती आहेत. एक म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दुसरी व्यक्ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली. (Priyanka Chopra include in Instagram richlist 2021, take 3 crore for one Instagram post)

प्रियांका चोप्राची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोविंग आहे. इंस्टाग्रामवर तिला 65 मिलियन लोक फॉलो करतात. इंस्टाग्राम रिच लिस्ट 2021 मध्ये प्रियांका चोप्राचे नाव 27 व्या क्रमांकाला आहे. ती इंस्टाग्रामवर प्रत्येक प्रोफेशनल पोस्टसाठी 403, 000 डॉलर म्हणजेच 3 कोटी रुपये चार्ज करते.

या यादीत प्रियांका चोप्रासोबतच विराट कोहलीचे नाव देखील सामील आहे. विराट या यादीत 19 व्या क्रमांकाला आहे. तो त्याच्या इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी 5 कोटी रुपये चार्ज करतो. HopperHQ’s यांच्या कडून आलेल्या यादीत पहिल्या क्रमांकाचा फुटबॉलर क्रिस्तियानो रोनाल्डो आहे. तो एका पोस्टसाठी 11.9 कोटी रुपये चार्ज करतो.

प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती, याआधी शेवटची ‘द: व्हाइट टायगर’ या चित्रपटात दिसली होती. ती स्वतःच या चित्रपटाची निर्माती होती. प्रियांका हॉलिवूडमधील ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ‘मॅट्रिक्स 4’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.