अमेरिकन अभिनेता ऍलेक बाल्डविनने शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) न्यू मेक्सिकोमध्ये एका चित्रपटाच्या सेटवर एका महिला सिनेमॅटोग्राफरला गोळ्या घातल्या. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या बातमीने जगभरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक बातमी ऐकून ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनासलाही धक्का बसला आहे. या घटनेनंतर तिने सिनेमॅटोग्राफर हलिनाबद्दल शोक व्यक्त करत, सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, चित्रपटाच्या सेटवर कोणी मरू नये.
अमेरिकन अभिनेता ऍलेक बाल्डविनने प्रोप गनने गोळीबार केल्याच्या या घटनेने, संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. या घटनेनंतर प्रियांकाही खूप दुःखी झाली आहे. तिने हलिनाचा एक फोटो ट्विट केला आहे, ज्यात तिने दिवंगत सिनेमॅटोग्राफरच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. (priyanka chopra on alec baldwin accidentally shooting film crew while rust shooting says no one should die of a film set)
I’m so shook. I cannot imagine what everyone involved in this tragedy is feeling. There are no words. No one should die on a film set. Period. My heart goes out to Halyna Hutchins family and everyone who knew her. ???? pic.twitter.com/C6fxT8kyir
— PRIYANKA (@priyankachopra) October 23, 2021
प्रियांकाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मला मोठा धक्का बसला आहे. या शोकांतिकेत सामील असलेल्या प्रत्येकाला काय वाटत असेल, याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझ्याकडे शब्द नाहीत. चित्रपटाच्या सेटवर कोणीही मरू नये. मला हलिना हचिन्सच्या कुटुंबाबद्दल आणि तिला ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी वाईट वाटते.” यापूर्वी अभिनेत्री कंगना रणौतनेही या संपूर्ण घटनेवर तिची प्रतिक्रिया दिली होती.
प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या तिच्या आगामी स्पाय थ्रिलर ड्रामा ‘सिटाडेल’चा एक भाग आहे. अभिनेत्रीने स्वतः चित्रपटात अनेक स्टंट केले आहेत, ज्यामुळे तिला अनेक जखमा देखील झाल्या आहेत. तिने तिच्या भुवया आणि डोक्याला झालेल्या दुखापतीचे काही फोटो शेअर केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-यावर्षी ‘हे’ सेलेब्रिटी साजरे करणार त्यांचे पहिले करवा चौथ
-‘माझा या गोष्टींवर विश्वास नाही’, म्हणत रिया कपूरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय