आपला देश अनेक विविधतेने नटलेला आहे. अनेक भाषा, धर्म असलेला हा देश नेहमीच वेगवेगळे सणवार साजरा करत असतो. जेवढे राज्य, तेवढ्या वेगवेगळ्या प्रथा इथे पाहायला मिळतात. आपल्या देशात नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावे आणि अखंड सौभाग्य लाभावे यासाठी विविध सण साजरे केले जातात. महाराष्ट्रात वटसावित्री, राजस्थानमध्ये गणगौर आदी अनेक राज्यांमध्ये विविध पूजा होतात ज्यातून वैवाहिक आयुष्यासाठी आशीर्वाद मागितले जातात. या पूजेमध्ये एक सर्वात प्रसिद्ध असणारी पूजा म्हणजे कारवाचौथ. पंजाबमध्ये साजरा होणाऱ्या या सणाला बॉलिवूडमुळे मोठे ग्लॅमर प्राप्त झाले आहे. २४ तारखेला सर्वत्र कारवाचौथ साजरी होणार आहे. यावर्षी बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या पहिल्या कारवाचौथमुळे खूपच उत्साहित आहे. या लेखातून जाणून घेऊया पहिली कारवाचौथ असणाऱ्या सेलिब्रिटींची नावे.
नताशा दलाल :
नताशा आणि अभिनेता वरूण धवनने यावर्षी सुरुवातीलाच लग्न केले. अतिशय खासगी आणि गुपचूप झालेल्या या सोहळ्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. वरुणने त्याची बालमैत्रीण असलेल्या नताशासोबत लग्न केले. यावर्षी नताशा तिचे पहिले कारवाचौथ साजरे करणार आहे.
अंगीरा धर :
बँड बाजा बारात, कमांडो ३, लव पर स्क्वेयर फीट आदी अनेक चित्रपटांमध्ये झळकलेल्या अंगीराने ३० एप्रिलला दिग्दर्शक आनंद तिवारीसोबत गुपचूप लग्न केले. तिचे देखील हे पहिले कारवाचौथ असणार आहे.
यामी गौतम :
अभिनेत्री यामी गौतमने जूनमध्ये दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यावर्षी तिचेसुद्धा पहिले कारवाचौथ असणार आहे.
एवलिन शर्मा :
‘ये जवानी है दिवानी’, ‘यारिया’, ‘मैं तेरा हिरो’ आदी सिनेमात झळकलेल्या एवलिनने ऑस्ट्रेलियातील डेंटल सर्जन आणि उदयगपती असणाऱ्या तुशान भिंडीसोबत लग्न केले. ती देखील यावर्षी तिचे पहिले कारवाचौथ साजरे करणार आहे.
प्रणिता सुभाष :
अभिनेत्री प्रणिता सुभाषने देखील तिचा मित्र असणाऱ्या उद्योगपती नितीन राजूसोबत लग्न केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अनन्या शाहरुख खानला म्हणाली होती ‘सेकंड डॅड’, नेमकं प्रकरण काय?
-आर्यन खान प्रकरण आणखी खोलात, शाहरुखच्या ‘मन्नत’वर पडली रेड
-‘डीडीएलजे’ चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण; ‘या’ अभिनेत्याने नकार दिल्याने शाहरुख बनला ‘किंग ऑफ रोमान्स’