Thursday, April 18, 2024

‘ज्या इंडस्ट्रीने मला…’, छेल्लो शो पाहिल्यानंतर प्रियंका चोपडाची पोस्ट चर्चेत

बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाचे खास ओळख निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रियंका चोपडा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. परदेशाची सून असली तरी ती भारताला विसरली नाही. भले अभिनेत्री अभिनयापासूव जरा लांब झाली असली, तरी ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. मध्य रात्री  भारताकडून ऑस्करसाठी पाठवलेला गुजराती छेल्लो शो (द लास्ट शो) चित्रपट पाहाण्यासठी एंजलिस मध्ये हजेरी लावली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्रीने तिची प्रतीक्रिया देखिल शेअर केली आहे.

देसी गर्ली प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) हिने नुकतंच भारतमधून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला गुरजराती ‘छेल्लो शो’ (द लास्ट शो) चित्रपट पाहाण्यासठी मध्ये रात्री हजेरी लावली होती. त्याशिवाय तिने आपल्या अधिकृत इस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ‘छेल्लो शो’ चित्रपटाचा बाल कलाकार राबरी आणि प्रियंका एकत्र पहायाला मिळत आहेत.

प्रियंकाने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “ज्या इंडस्ट्रीने मला सर्व काही शिकवले आहे त्याला मी नेहमीच पाठिंबा देत असते. माझ्या कामाबद्दल मला जे काही माहिती आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतून येणाऱ्या अप्रतिम चित्रपटांचा खूप अभिमान वाटतो. छेल्लो शो हा त्यापैकी एक खास चित्रपट आहे. शुभेच्छा टीम जा आणि त्यांच्यासाठी (ऑस्कर) घेऊन या. लॉस एंजेलिसमध्ये ‘छोल्लो शो’च्या प्रीमियरसाठी निर्मात्यांचे खूप आभार.”

 

View this post on Instagram

 

प्रियंकाने पुढे लिहिले की, “प्रादेशिक भाषेतील (गुजराती) चित्रपट, जो 95 व्या अकॅडमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपटाच्या श्रेणीमध्ये भारतातून अधिकृतपणे पाठवण्यात आला आहे. दिग्दर्शक पान नलिन यांचा हा चित्रपट एक उत्तम चित्रपट आहे. ज्याच्या कथेत 9 वर्षाच्या मुलाची सिनेमाशी असलेली अनोखी जोड दिसून येते.”

सांगायचे झाले तर, छेल्लो शो हा चित्रपट भारतातून ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. या चित्रपटाचे नाव समोर आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला होता. कारण अनेक चित्रपट प्रेमिंना ‘आरआरआर’, ‘केजाएफ’, आणि ‘द-काश्मीर फाइल्स’ फाइल्स या चित्रपटांची खात्री होती मात्र. अयत्यावेळी या चित्रपटाचे नाव समोर आल्यानंर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जाळ अन् धूर संगटच! प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखवला बोल्ड अंदाज, नेटकरीही म्हणाले, ‘तुमचे *** पाहून मन…’
काय सांगता! पूर्ण कपडे न घालण्यामागे उर्फी जावेदने सांगितले धक्कादायक कारण, तुम्हीही व्हाल हैराण

हे देखील वाचा