Thursday, April 18, 2024

प्रियांका चोप्राच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता, देसी गर्ल करणार संजय लीला भन्साळींच्या ‘या’ चित्रपट काम

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आता ग्लोबल स्टार बनली आहे. सध्या प्रियांका भारतात आली आहे. ती पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत मुंबईत आहे. नुकतीच ती आपल्या मुलीसह पतीसह राम लल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत आली होती, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अभिनेत्रीच्या बॉलिवूडमध्ये पुनरागमनाच्या बातम्या येत आहेत.  प्रियांका तिच्या पुढील बॉलिवूड प्रोजेक्टसाठी सध्या मुंबईत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांच्यासोबत पुन्हा काम करण्यासाठी चर्चा करत आहे. 
प्रियांका चोप्राची ही संपूर्ण ट्रिप तिच्या प्रोजेक्ट्सबद्दल आहे. प्रियांका तिच्या प्रोडक्शन हाऊसवरही लक्ष केंद्रित करेल आणि तीन किंवा चार प्रकल्पांचे काम करणार आहे. प्रियांका तिच्या बॉलिवूड कमबॅकमुळे अनेक चित्रपट निर्मात्यांना भेटत असल्याच्या देखील बातम्या येत आहेत आहे. ती संजय लीला भन्साळी यांच्यासोबत एका पीरियड ॲक्शन चित्रपटासाठी चर्चेत आहे.
प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये तिच्या कमबॅकबद्दल खूप उत्सुक आहे. यामुळे तिला तिचा पुढचा प्रोजेक्ट लवकरात लवकर साईन करून त्यावर काम करायचे आहे. यासाठी ती अनेक स्क्रिप्टही पाहत आहे.
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा एका ॲक्शन प्रोजेक्टसाठी संजय लीला भन्साळीला भेटत आहे. तिला हा प्रोजेक्ट आवडला आहे. तिचे वेळापत्रक आणि वेशभूषा ठरवण्यासाठी ती आता भन्साळींशी चर्चा करत आहे. प्रियांकाच्या बॉलीवूडमध्ये पुनरागमनाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रियंका चोप्रा शेवटची वेब सीरिज ‘सिटाडेल’मध्ये दिसली होती. ‘टायगर’ या ॲनिमेटेड चित्रपटासाठी ती डिस्नेसोबत काम करणार आहे. याबद्दल अभिनेत्री खूप उत्सुक आहे.

हे देखील वाचा