Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड प्रियांका आणि निक घेणार घटस्फोट? सोशल मीडियावर प्रियांकाने हटवले निकचे आडनाव

प्रियांका आणि निक घेणार घटस्फोट? सोशल मीडियावर प्रियांकाने हटवले निकचे आडनाव

ग्लोबल अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिच्याबाबत अशी माहिती समोर आली आहे की, तिने सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या पतीचे म्हणजेच निक जोनासने आडनाव काढले आहे. यावरून आता सोशल मीडियावर सर्वत्र अशी चर्चा चालू आहे की, प्रियांका आणि निक घटस्फोट घेणार आहेत. त्यांच्या चाहत्यांना असे वाटत आहे की, निक आणि प्रियांकामध्ये काहीतरी झाले आहे आणि ते दोघे वेगळे होणार आहेत. अशातच प्रियांका चोप्राच्या एका कमेंटवरून हा खुलासा झाला आहे की, तिला घटस्फोट घ्यायचा आहे की, निकसोबत राहायचे आहे?

निकने काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर वर्कआउट करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो हार्ड वर्कआउट करताना दिसत आहे. त्याच्या नात्याबाबत होत असणाऱ्या या चर्चांमध्ये त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत.‌ पोस्टवर प्रियांका चोप्राने या सगळ्या अफवांना पूर्णविराम देत एक कमेंट केली आहे. या कमेंटमध्ये तिने तिच्या पतीसोबत आयुष्यभर राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच तिने तिच्या पतीच्या मिठीतच मरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Priyanka Chopra remove nik’s surname on social media, actress react on her husband)

या आधी प्रियांकाची आई मधू चोप्रा हिने प्रियांका आणि निक जोनस यांचा घटस्फोटावर तिची प्रतिक्रिया दिली होती. सोशल मीडियावर चाललेल्या या अफवांवर तिने सांगितले होते की, हे सगळ खोटं आहे, अशा अफवा पसरवू नका.”

प्रियांका आणि निकने २०१८ साली राजस्थानमधील जोधपूरमध्ये लग्न केले होते. त्यांनी हिंदू आणि इसाई रीतीरिवाजानुसार लग्न केले होते. प्रियांका निकला तेव्हा भेटली होती जेव्हा ती हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अमेरिकेला गेली होती. निक हा प्रियांकापेक्षा वयाने लहान असल्याने त्यांना अनेकवेळा ट्रोल केले जाते. परंतु ते या सगळ्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती

-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा

-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…

हे देखील वाचा