Monday, July 1, 2024

“तसे झाले तर मी देश सोडायला तयार” प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ विधानाने वेधले लक्ष

प्रियांका चोप्रा सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सिटाडेल’ या वेबसिरीजमुळे कमालीची प्रकाशझोतात आली आहे. या सिरीजमध्ये तिच्या ऍक्शन सीन्सची सर्वत्र चर्चा आहे. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील प्रियांकाने तिची ओळख निर्माण केली आहे. सध्या प्रियांकाकडे अनेक प्रोजेक्ट्स आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या करियरबद्दल आणि मुलगी मालतीबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

जानेवारी २०२२ मध्ये प्रियांका चोप्रा सरोगसीच्या माध्यमातून आई झाली. तिची मुलगी आता एक वर्षाची झाली असून ती स्टंटमुलीबद्दल भरभरून बोलताना दिसते. प्रियांकाने अनेकदा तिच्या बोलण्यातून दाखवून दिले आहे की, मालती तिच्यासाठी किती महत्वाची आहे. आता देखील एका मुलाखतीमध्ये तिने मालतीबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाने सांगितले की, जर मालती म्हणाली, तर ती देश बदलण्यासाठी आणि माझे करियर सोडण्यासाठी देखील तयार आहे. तिच्यासाठी त्याग करणारे आई-वडील तिला मिळाले यासाठी ती स्वतःला खूप भाग्यवान समजते. सोबतच प्रियांकाने हे देखील सांगितले की, महिलांचा सन्मान करण्याची शिकवण मुलांना दिली पाहिजे. मुलींना देखील स्वतःचा निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवले पाहिजे. प्रियांकाला मुलगी मालती खूपच नशिबाने मिळाली आहे. ती झाली तेव्हा तिला अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर ती बरी झाली.

दरम्यान प्रियांका एक उत्तम आई असून, ती सतत तिच्या कामातून वेळ काढत मुलीला देत असते. तिला घेऊन फिरते. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रियांकाकडे सध्या अनेक सिनेमे असून, लवकरच ती ‘जी ले जरा’ या सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांच्याशी भेट झाल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’बद्दल लिहिले…
‘तरुण भारत तयार होतो’ टाईम मासिकावर झळकल्यानंतर दीपिका पदुकोणचे भारताबद्दलचे ‘ते’ व्यक्तव्य चर्चेत

हे देखील वाचा