Saturday, July 6, 2024

प्रियांका चोप्राचा ‘तो’ फोटो पाहून निक जोनासही झाला वेडा; कमेंट करत म्हणतोय, ‘तू खूपच…’

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यँत आपल्या अभिनयाच्या जोरावर झेप घेणारी ग्लोबल स्टार म्हणजे प्रियांका चोप्रा. तिच्या अदांनी तिने आख्या जगाला वेड लावले आहे. देश-विदेशात तिचे चाहते पसरले आहेत. तिच्या बोल्ड लूकने आणि अभिनयाने आज सर्वांवर जादू केली आहे. प्रियांका ही सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. ती दरदिवशी तिच्या चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असते. सध्या ती तिचा पती निक जोनासपासून दूर लंडनमध्ये ‘सिटाडेल’ची शूटिंग करत आहे. शूटिंगवरील एक सेल्फी तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा फोटो पाहून पती निक जोनास हा स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्याने खुलेआम सगळ्यांसमोर त्याचे प्रेम जाहीर केले.

प्रियांका चोप्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिचा अंदाज वेड लावणारा आहे. या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. यामध्ये तिने न्यूड मेकअप केला आहे. हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले होते की, “#selfie #citadel.”

हा फोटो पाहून निकने तिला लगेच कंमेंट केली आहे. त्याने लिहिले की, “तू खूपच हॉट आहेस,” या सोबतच त्याने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तिच्या चाहत्यांना देखील हा फोटो खूपच आवडला आहे. तिचे चाहते तिच्या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.

प्रियांका चोप्राने अनेक चित्रपटात काम केले आहे. आता हॉलिवूडमध्ये देखील खूप काम करून तिचे नाव कमावले आहे. याआधी तिने ‘द : व्हाईट टायगर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘मॅट्रिक्स ४’ या चित्रपटात काम केले आहे. ती हिंदी चित्रपटात शेवटचे फरहान अख्तरसोबत ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

हे देखील वाचा