Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते विजय गिलानी यांचे दुःखद निधन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते विजय गिलानी यांचे दुःखद निधन

सलमान खानच्या ‘वीर’ सिनेमाचे निर्माता असलेल्या विजय गिलानी यांचे दुःखद निधन झाले आहे. बुधवार (२९ डिसेंबर) रोजी रात्री त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. सलमान खान, अमृता सिंग, शिबा या तिघांना घेऊन त्यांनी ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा तयार केला. त्यानंतर २०१० साली ‘वीर’ सिनेमा देखील त्यांनी सलमानसोबत केला. विजय मागील काही महिन्यांपासून ब्लड कॅन्सरने ग्रस्त होते. ते कॅन्सरवर लंडन इथे उपचार करत होते.

एका मोठ्या वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार विजय गिलानी हे ब्लड कॅन्सरने पीडित झाल्यानंतर साधारण तीन महिन्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत लंडन इथे जात बॉन मॉरो ट्रान्सप्लांट केले होते.या ऑपरेशनच्या काही महिने आधीच त्यांना कॅन्सर झाल्याचे लक्षात आले होते. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितले की, विजय गिलानी यांचा मुलगा प्रतीक गिलानी हा काही दिवसांपूर्वीच भारतात आला होता. मात्र आता विजय यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर तो पुन्हा लंडनला रवाना झाला.

विजय गिलानी यांनी अक्षय कुमार (Akshay Kumar), बॉबी देओल (Bobby Deol), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि बिपाशा बसु (Bipasha Basu) यांच्या २००१ साली आलेल्या सुपरहिट ‘अजनबी’ (Ajnabee) चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर २००१ साली गोविंदा (Govinda) आणि मनीषा कोईराला (Manisha Koirala) ‘अचानक’ (Achanak) या सिनेमाची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) आणि श्रुति हसन (Shruti Haasan) यांच्यासोबत ‘द पावर (The Power) या सिनेमाची निर्मिती केली होती.

हेही वाचा :

हे देखील वाचा