Monday, July 1, 2024

‘गांधी गोडसे: एक युद्ध’ चित्रपटाला नेटकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे, आंदोलन करत म्हणाले, ‘तुम्ही नथुराम गोडसे…’

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि चित्रपट निर्माता राजकुमार संतोषी यांचा आगामी येणारा गांधी गोडसे: एक युद्ध हा चित्रपट येत्या (दि, 26 जानेवारी) रोजी सिनेमागृत प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकला आहे. ‘या चित्रपटात नथुरामला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्यास चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडण्यात येईल’, असा इशारा अमर हुतात्मा हिंदू महासभेने दिला होता. त्याशिवाय आता मुंबईमधील लोकांनी देखिल चित्रपटाविरोधात आंदोलने पुकारली आहेत.

चित्रट निर्माती राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांनी शुक्रवार (दि, 20 जानेवारी) रोजी चित्रपटाचे प्रमोशन करत असताना त्यांना काही लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. प्रमोशनदरम्यान काही लोकांनी कार्यक्रमात काळे झेंडे दाखवले असून जोरदार घोषणाबाजी करत चित्रपटावर टिका केली आहे. विरोध करणारे लोक एवढे आक्रमक झाले की, त्यांना अडवण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले. त्यांच्या मते या चित्रपटामध्ये  महात्मा गांधीना कमी लेखले असून त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचा गौरव केला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटामध्ये गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याचा गौरव केला असल्याचा आरोप आंदोलकरांनी केला आहे. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी आंदोलन करणाऱ्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता मात्र, लोकांचा राग एवढा अनावर होता की, निर्माती त्यांना समजवण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाली आणि शेवटी त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली.

 

View this post on Instagram

 

चित्रपट निर्मात्यांनी सांगितले की, हा चित्रपट नथुराम गोडसे यांचा गौरव करत नाही मात्र, तरिही लोक ऐकण्यास तयार नाव्हते त्यामुळे त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात सापडला आहे. ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटाद्वारे संपोषी यांची मुलगी तनीषा संतोषी (Tanisha Santoshi)आणि दीपक अंतानी (Deepak Antani) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याशिवाय चिन्मय मांडलेकर (Chimay Mandlekar) देखिल महत्वाची भूमिका साकारत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा
सुशांत सिंग राजपूतला खूपच आवडायची आपली ‘ही’ शानदार कार; एकेकाळी पाहायचा विकत घेण्याचे स्वप्न

हे देखील वाचा