Friday, August 8, 2025
Home बॉलीवूड सोनू सूद नवज्योत सिंग सिद्धू यांना म्हणाला ‘चांगला माणूस’, पण मुख्यमंत्री म्हणून चन्नी आहेत पहिली पसंती

सोनू सूद नवज्योत सिंग सिद्धू यांना म्हणाला ‘चांगला माणूस’, पण मुख्यमंत्री म्हणून चन्नी आहेत पहिली पसंती

पंजाब विधानसभा निवडणुकीला अवघे २१ दिवस उरले आहेत. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदही (Sonu Sood) आजकाल पंजाबमध्ये असून तो आपल्या बहिणीचा आणि काँग्रेस पक्षाचा प्रचार करत आहे. सोनूची बहीण मालविका सूद सच्चर यांना काँग्रेसने मोगा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. माध्यमांना दिलेल्या विशेष मुलाखतीत सोनू बहिणीच्या काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर म्हणाला की, “सर्व पक्ष चांगले आहेत, परंतु पक्षाचा मुख्य चेहराच पक्षाला चांगला किंवा वाईट ठरवतो.” तसेच सोनू म्हणाला की, मोगामध्ये काँग्रेसचा कॅडर खूप मजबूत आहे. विचारधारेच्या प्रश्नावर सोनू म्हणाला की, ही लोकांची बनलेली असते, एकाच पक्षात अनेक विचारधारा असतात.

त्याचवेळी राजकारणात येण्याच्या प्रश्नावर सोनू म्हणाला की, तो सध्या राजकारणात येत नाही. शिवाय त्याला खूप मोठ्या ऑफर्स आल्या होत्या, त्यात टॉप पोस्टही ऑफर झाल्याचे सांगितले. सोनू म्हणाला की, “एक अभिनेता म्हणून आयुष्यात अजून खूप काही करायचे आहे.” सोनूने सांगितले की, “मला लोकांसाठी काम करायचे आहे आणि मी अजूनही लोकांसाठी काम करत आहे आणि अजून खूप काम करायचे आहे.”

‘सीएम चन्नी यांनी १११ दिवसांत अप्रतिम काम केले’- सोनू सूद
नवज्योत सिंग सिद्धूला आपला चांगला मित्र म्हणून सांगताना सोनू म्हणाला की, “ते एक चांगले आणि अद्भुत व्यक्ती आहेत.” सीएम चरणजीत सिंग चन्नी यांचे कौतुक करताना तो म्हणाला की, त्यांनी १११ दिवसांत अप्रतिम काम केले आहे. तसेच त्यांचे प्रयत्न अप्रतिम असल्याचे सांगितले. त्याने चरणजित सिंग चन्नी यांचे तगडे उमेदवार म्हणून वर्णन केले. सोनू म्हणाला की, त्यांना लोकांमध्ये सीएम चन्नी यांचा आवाज थोडा उंच वाटतो. त्याचवेळी नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी या प्रश्नावर सोनू सूद शांत झाला. राहुल गांधी हे स्थिरावलेले व्यक्ती असल्याचे सांगून सोनू म्हणाला की, त्यांच्याकडे देश बदलण्याची आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची दृष्टी आहे.

सोनू सूद म्हणाला की, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खूप मोठा चाहता आहे. तसेच त्यांनी अप्रतिम काम केल्याचे सांगितले. भारताला लोकांमध्ये एक मोठे व्यासपीठ देण्यात आले आहे. सोनू सूद म्हणाला की, “तुम्ही काम केले तर जनता तुम्हाला नेता बनवेल.” सोनू सूद म्हणाला की, पंजाबमध्ये काँग्रेसची आणि देशात भाजपची मजबूत पकड आहे.

हेही वाचा :

‘बिग बॉस १५’ ला मिळाली विजेती स्पर्धक, ट्रॉफीवर कोरले तेजस्वी प्रकाशचे नाव

शाहिद आणि मीराची जोडी पुन्हा एकदा आली चर्चेत, सोशल मीडियावर व्हायरल होतोय नवा फोटो

‘हे’ आहेत आलिया भट्टच्या करिअरला कलाटणी देणारे सुपरहिट चित्रपट, वाचा संपूर्ण यादी

हे देखील वाचा