Thursday, February 22, 2024

बिगबाॅस विजेत्या मुनावर वगळ्याच शैलीत दिले सलमान खानला धन्यवाद,इंस्टावर शेअर केली पोस्ट

सलमान खान होस्ट करत असणारा रियालिटी शो ‘बिगबाॅस’ च्या 17व्या सिझनचा महाअंतिम सोहळा काल 28 जानेवारीला पार पडला. यासोहळ्याच्या शेवटी सिझनच्या विजेत्याचीही घोषणा केली गेली. टाॅप 5मध्ये पोहोचलेल्या अंकिता लोखंडे(Ankita Lokhande), मन्नारा चोप्रा(Mannara Chopra), अभिषेक कुमार, अरुण माशेट्ट यासर्वांना मागे सोडत बिग बॉस 17मध्ये मुनावर फारुकीने(Munawar Faruqui) बाजी मारली. मुनावरने विजयानंतर त्याच्या सोशल मिडियावर एक पोस्ट करत या शोच्या होस्टचे आभार मानले आहेत. यासोबतंच अभिनेता त्याच्या बिगबाॅसच्या प्रवासातील चढ-उतारावरही मनमोकळेपणाने बोलला.

भाई जानचे मानले आभार
‘बिगबाॅस 17 ‘च्या वजयानंतर मुनावर फारूकीने नुकतेच त्याच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने सलमान खानसोबतचा त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो ‘बिगबाॅस 17 ‘ व्या सिझनची ट्राॅफी पकडुन सलमान खानससोबत उभा आहे. फोटो शेअर करत मुनावरने लिहिल,” जनतेचे खुप खुप आभार ” त्याने पुढे भाईजानचे आभार मानत लिहिले,”तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे शेवटी ट्राॅफी डोंगरीमध्ये आलीच. मार्गदर्शनासाठी मोठा भाऊ सलमान खानचे(Salman Khan) खुप खुप आभार.”

ट्राॅफीसोबत मिळाले हे बक्षीस
‘बिग बाॅस’ च्या 17 व्या(Big Boss 17) सिझनचा विजेता मुनावर फारूकीला 50 लाख रुपयांचा प्राइज मनी देण्यात आला आहे. त्यासोबतंच विजेत्याला एक नवीकोरी गाडी आणि सिझन 17ची थिम (दिल, दिमाग और दम) यावर आधारित बनवलेली एक ट्राॅफीदेखील दिली आहे. सांगितलं जातंय की मागच्या सिझनपेक्षा या सिझनमध्ये दिलेली रक्कम जास्त आहे.

आईला समर्पित केली ट्राॅफी
मुनावर फारुकीने बिगबाॅस17ची ट्राॅफी जिंकली आहे. ही ट्राॅफी घेतानाचा त्याचा अनुभव शेअर करत तो म्हणाला,”हा अनुभव स्वप्नवत होता. ज्यापद्धतीचा माझा आतापर्यंतचा प्रवास होता. तो क्षण असा होता की मी त्या ट्राॅफीचं वजन फील करू शकत होतो.या ट्राॅफीसाठी मला खुप किंमत चुकवावी लागली आहे. ” मुनावर पुढे ही ट्राॅफी त्याच्या आईला समर्पित करत त्याने एक हिंदी कवितेच्या ओळी लिहिल्या , “तु सोबत नव्हतीस आई पण तुझी सावली नेहमी माझ्या सोबत होती. किती प्रसिद्धी मिळवली होती. ते तोडण्यासाठी आले होते माझा मातीचा बंगला. पण मुलाने मुमताजचा त्यांचा ताज हिसकावून आणला होता ”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

दुर्घटनेचा शिकार होण्यापासून थोडक्यात बचावला कार्तिक आर्यन, चाहत्यांनी तोडले बॅरिकेड
Rape case | प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर पुण्यातील मुळशी येथे बलात्कार

 

हे देखील वाचा