Monday, June 24, 2024

‘पुष्पा 2’ सिनेमाच्या कलाकारांचा शूटिंगदरम्यान दोन बस एकमेकांवर आदळल्यामुळे झाला भीषण अपघात

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा 2: द रूल’ या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पुष्पा सिनेमाला मिळालेले यश पाहून ‘पुष्पा 2: द रूल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवनवीन रेकॉर्ड करणार हे नक्की. सध्या सिनेमाचे जोरदार शूटिंग सुरु असून, याबद्दल अधिक माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र आता पुष्पा 2: द रूल’ या सिनेमाबद्दल एक वाईट बातमी समोर येत आहे. नुकताच या सिनेमाच्या टीमचा एक अपघात झाला आहे.

एका मोठ्या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार या चित्रपटाची टीम एका बसमधून प्रवास करत असताना तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील नारकेतपल्ली येथे ती बस दुसऱ्या बसवर जाऊन आदळली. या अपघातात चित्रपटाच्या टीम बसमधील काही लोकं जखमी झाले असून, काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर लगेच जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून, काहींना मलमपट्टी करून सोडण्यात आले आहे, तर काहींना ऍडमिट केले आहे. या घटनेबद्दल अधिक माहिती अजून प्रप्त झालेली नाही.

दरम्यान ‘पुष्पा २’ सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या या सिनेमाची शूटिंग सुरु असून, बातम्यांनुसार अभिनेत्री साई पल्लवी देखील या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय निर्माते या सिनेमात एका मोठ्या बॉलिवूड स्टारला घेण्याचा देखील विचार करत आहे. मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मिळणाऱ्या माहितीनुसार सर्व काही योग्य असल्यास आणि वेळेत झाल्यास पुष्पा २ हा सिनेमा याचवर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित केला जाईल. आता फक्त पुष्पा २ सिनेमाचे पोस्ट प्रदर्शित केले गेले असून, यात अल्लू अर्जुन निळ्या आणि लाल रंगाच्या लूकमध्ये साडी नेसलेला दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘चित्रपटांमध्ये प्रेमळ वागते अन् वास्तवात…’, करीना कपूर का हाेतेय ट्राेल? लगेच वाचा
मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्याचे लिव्हरच्या गंभीर आजाराने निधन, उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव होती चालू

हे देखील वाचा