Monday, July 1, 2024

‘पुष्पा 2’चा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी उघडणार रहस्य?

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा 2‘ या चित्रपटासाठी खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग म्हणजेच ‘पुष्पा’ वर्षांभरापूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, ज्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला, त्यानंतर अल्लू अर्जुनचे चाहते चित्रपटाच्या सिक्वलची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, निर्मात्यांनी ‘पुष्पा द रुल’ संदर्भात एक मोठे अपडेट दिले आहे. खरे तर, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्विटरवर ‘पुष्पा 2’ शी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुनची झलक पाहायला मिळत आहे. 20 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पुष्पा तिरुपती जेलमधून पळून गेला आहे. तुरुंगातून फरार झाल्यानंतर तो आता कुठे आहे हे 7 एप्रिलला दुपारी 4 वाजता कळेल. हा व्हिडीओ शेअर करताना मेकर्सनी लिहिले की, ‘सर्च आणि लवकरच!’

‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाबद्दल सांगायचे झाले, तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 350 कोटींहून अधिक होते. या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या विरुद्ध दक्षिणेची दिग्गज अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसली होती, ज्यांना लाेकांचे भरभरून प्रेम मिळाले. अशात या चित्रपटाचा सिक्वल चाहत्यांच्या अपेक्षा किती पुर्ण करताे हे पाहण्यासारखे ठरेल.(pushpa makers announcement regarding of tollywood actor allu arjun film pushpa 2)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुष्मिता सेनने पुन्हा पकडला एक्स बाॅयफ्रेंड रोहमन शॉलचा हात? अभिनेत्रीचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल

‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील “ती” चूक दिग्दर्शक ओम राऊतच्या अंगाशी! टीमच्या विरोधात तक्रार दाखल

हे देखील वाचा