Tuesday, May 28, 2024

दु:खद! पंजाबच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास…

पंजाबमधील प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौर  यांचे गुरुवार (दि, 17 नोव्हेंबर) रोजी वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले आहे. त्या अनेक दिवसांपासून आजारपणाशी झुंज देत होत्या. त्यांनी पंजाबीच नाही तर हिंदी चित्रपटामध्ये देखिल काम केले आहे. त्यांच्या आचानक निधनाच्या बातमीने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांनी पंजाबी इंडस्ट्रीमधील 70 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केले होते.

पंजाबी इंजस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौर (Dalijit kaur) यांचे दिर्घ आजारपणाने वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी पंजाबमधील अनेक चित्रपटामध्ये काम केले असून बॉलिवूडमध्ये 10 चित्रपटांपेक्षा जास्त चित्रपटामध्ये आपली छाप सोडली होती. त्यां अनेक दिवसांपासून आजारपणाशी झुंज देत होत्या, शेवटी त्यांच्या शरिराने  साथ सोडली आणि गुरुवारी त्यांनी डोळे मिटले. दुपारी 12 नाजता त्यांचा अंतिम संस्कार केला जाईल.

अभिनेत्री दलजीत यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात पुणे चित्रपट संस्थानमधून केली होती. त्यांनी पहिला चित्रपट ‘दाज’ 1976 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर तिने प्रसिद्ध पंजाबी चित्रपट ‘पुट जट्टन दे’, ‘मारामन गुल है’, ‘की बनू दुनिया दा’, अनेक चित्रपटामध्ये काम केले होते. ‘सरपंच और पटोला’ या चित्रपटामध्ये दलजी यांनी सरपंचची मुख्य भूमिका निभावली होती. त्यांनी अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले होते. त्यांचे पती हरमिंदर सिंग (Harmandir Singh) यांचा रत्यावरील एका गाडीच्या अपघाताने मृत्यु झाला. यानंतर दलजीत यांनी अभिनय क्षेत्राला राम राम ठोकला.

दलजीत कौर यांना एकही संतान नाही. पती गेल्यानंतर त्यांनी 2001 साली परत अभिनय क्षेत्रामध्ये पाय ठेवला असून त्यांनी त्यांच्या वयानुसार भूमिका स्वीकारल्या. त्यांनी पंजाबी चित्रपट ‘सिंह बनाम कौर’ यामध्ये  गिप्पी ग्रेवालची आईची भूमिका निभावली होती. दलजीत यांना अभिनयच नाही तर स्पोर्टसमध्यही छंद होता.

दलजीत कौर यांचा जन्म 1953 साली सिलीगुडी या गावामध्ये झाला होता. तदलजीत गेल्या 12 वर्षापासून चुलत भाऊ हरजिंदर सिंग याच्यासोबत कस्बा गुरुसर समथर बाजारमध्ये राहात होत्या.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
अपारशक्तीने मध्यरात्री केले होते आकृतीला प्रपोज, जाणून घ्या त्यांची प्यार वाली लव्हस्टोरी
HBD साऊथची धकधक गर्ल ‘नयनतारा’ : प्रभुदेवासाठी ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्विकारला मात्र….

हे देखील वाचा