Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

जय अन् मीरामध्ये चांगलीच जुंपली; ‘अशा’प्रकारे रंगला ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरामध्ये कॅप्टन पदाचा डाव

‘बिग बॉस मराठी ३’ च्या या आठवड्यात पहिल्याच कॅप्टन पदासाठी डाव रंगला होता. या आठवड्यात मीरा जग्गनाथ आणि उत्कर्ष शिंदे यांच्यामध्ये हा डाव झाला. साप्ताहिक कार्यात सर्वाधिक पॉइंट मिळून उत्कर्ष हा विजयी ठरला होता. यावेळी बिग बॉसने त्याला त्याच्यासोबत एक महिला सहविजेती ठरवण्याचा अधिकार दिला होता. त्यावेळी त्याने मीराचे नाव घेतले होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये ‘फाशांचा खेळ’ हा डाव रंगला. त्यावेळी दोघांना ही दोन दोन सदस्य निवडण्याचा अधिकार होता. त्यावेळी मीराने मीनल आणि विकास यांना निवडले, तर उत्कर्षने विशाल आणि जय यांना निवडले. या खेळाची संचालिका गायत्री ही होती.

या खेळात त्यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती. शारीरिक बळ लावल्याने मीराचा संघ ताकद लावण्यात कमी पडला. यावेळी जय आणि विशाल हे किचन टीममध्ये असल्याने मीरा त्यांचे टास्कपासून लक्ष विचलित करण्यासाठी खूप बोलते. या दरम्यान ती मोठ्याने टाळ्या वाजवत किचनमधील बायकांनी किचनमध्ये जा असे बोलते, पण याचा काहीही परिणाम होत नाही. उलट जय म्हणतो की, “आम्हाला अभिमान आहे आम्ही इतरांना जेवण बनवून देतो.” यानंतर जय आणि मीनलमध्ये देखील खूप वाद होतात. (Quarrel between jay and minal, meera reject power card, captain task was intrested in bigg Boss Marathi 3 house)

हा सामना जिंकण्यासाठी दोघेही खूप अटीतटीने लढत असतात. शेवटी हा सामना बहुसंख्येने विजयी होऊन उत्कर्ष जिंकला. नियमाप्रमाणे बिग बॉसने त्याला विजेता घोषित करून त्याचे अभिनंदन केले आणि त्याला कर्णधारपद किंवा टेम्प्टेशन रूम यापैकी एकाची निवड करायला सांगितली. यावेळी त्याने कर्णधारपदाची निवड केली. दुसरीकडे पर्यायाने मीराला टेम्प्टेशन रूममध्ये जाण्याचा अधिकार मिळाला आणि ती या पर्वातील पहिले शक्तीपदक मिळवणारी सदस्य घोषित झाली.

या शक्ती पदकाच्या साहाय्याने ती टेम्प्टेशन रूममध्ये गेली. त्यावेळी तिच्या वाट्याला पावरकार्ड आले होते. या पावर कार्डचा वापर करून ती कर्णधारपद मिळवू शकली असती, तर त्यामुळे उत्कर्षला तोटा झाला असता. त्याला कर्णधारपद तर मिळाले नसतेच आणि त्याला आठवडाभर गार्डनमध्ये झोपावे लागणार होते. तसेच पावर कार्डमध्ये केवळ या पर्वामध्ये चार व्यक्तींच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. मात्र, मीराने हे पावर कार्ड नाकारले आणि तिला त्यातील एक पान फाडून टाकायला सांगितले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूरच्या आयुष्यात ‘Someone special’ची एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘तयार व्हा’

-‘प्रिय मोदीजी अमेरिका दौऱ्यावरुन येताना माझ्यासाठी ‘या’ गोष्टी आणा’, राखी सावंतची पंतप्रधानांकडे अजब मागणी

-‘सहनशीलता आपल्याला स्ट्रॉंग बनवते’, म्हणत रिकव्हर होणाऱ्या शिल्पाने शेअर केली पोस्ट

हे देखील वाचा