Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बिग बॉस मराठीच्या नॉमिनेशन टास्कमध्ये उडाले मीनल आणि स्नेहामध्ये खटके, पाहायला मिळाली स्नेहाची रागीट बाजू

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील दुसऱ्या आठवड्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. पहिल्या आठवड्यात ओटिंग लाईन बंद असल्याने सगळे स्पर्धक पुढच्या आठवड्यासाठी सुरक्षित झाले आहेत. पुढचा आठवडा सुरू होताच बिग बॉसने स्पर्धकांना येत्या आठवड्याची थीम संगितली आणि नॉमिनेशन टास्क देखील घेतला. या आठवड्यातील थीम असणार आहे ‘जोडी की बेडी.’ म्हणजेच बिग बॉसने दोन दोन सदस्यांची जोडी बनवून दिली आहे. शेवटी तीन सदस्य राहतात तेव्हा त्यांनी एक त्रिकुट तयार केले. आता आठवडाभर या सदस्यांना त्यांच्या नेमून दिलेल्या पार्टनरसोबतच राहावे लागणार आहे. तसेच त्रिकुटामध्ये आविष्कार, शिवलीला आणि मीनल हे तीन सदस्य आहेत. यासोबतच घरात नॉमिनेशन टास्क पूर्ण झाला आहे.

या आठवड्यात प्रत्येक जोडीला आणखी दोन जोड्या सहमताने नॉमिनेट करण्याचा अधिकार होता. यावेळी बहुमताने आविष्कार, शिवलीला , मीनल, विशाल, विकास, जय आणि गायत्री हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यानंतर बिग बॉसने पुन्हा एकदा जे नॉमिनेट झालेले सदस्य आहेत त्यांना त्यांच्या जागी कोणाचे नाव घ्यायचे आहे, असे स्पष्टीकरण द्यायला सांगितले. मीनल तिचे मत मांडताना म्हणाली की, “मी स्नेहाला कधीच जास्त मिक्स होताना पाहिले नाही. त्यांचा मला परफॉर्मन्स दिसला नाही.” यावर स्नेहा म्हणाली की, “आता मी काय समोर येऊन डान्स करायला पाहिजे होता का?” यावर मीनल म्हणते की, “मी नीट बोलत आहे तुमच्याशी. मला फक्त एवढच म्हणायचं आहे आपल्यात संवाद नाही होत.” यावर स्नेहा म्हणते की, “म्हणजे मी काय येऊन सांगत बसू का माझ्या आयुष्यात काय झालं, कसं झालं सगळं. याला संवाद म्हणतात का? तुम्ही येऊन जर हाय हॅलो केलं तर ते मी पण करते.” (Quarrel between minal shah and sneha wagh in nomination task in bigg Boss Marathi 3 house)

यानंतर मीनल म्हणते की, “मला असं वाटत की, स्नेहा त्यांच्या मतावर ठाम नसतात. जिकडे जास्त मतं असतात तिकडे त्या जातात.” या गोष्टीला मात्र घरातील इतर लोक देखील नकार दर्शवतात. तेव्हा स्नेहा खूप चिडते आणि म्हणते की, “मी माझ्या मतावर जेवढी ठाम आहे तेवढं या घरात कोणीही नाहीये. मी माझे निर्णय बदलत नाही.” यावर त्यांच्यात जरा वाद होतो. बिग बॉसने ‘जोडी की बेडी’ हे कार्य सोपवले आहे. पण शेवटपर्यंत ही जोडी राहते की, त्यांच्यात भांडणं होतात हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक आहेत.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रावर प्रश्न ऐकताच मीडियावर चिडली शिल्पा, म्हणाली ‘मी राज कुंद्रा आहे का?’

‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार

हे देखील वाचा