Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘महिला, महिला आणि भांडायला नंबर पहिला’, सोनाली पाटील अन् तृप्ती देसाईमध्ये पेटला वाद

‘बिग बॉस मराठी ३’ ला आता एक आठवडा पूर्ण होत आला आहे. घरात आलेल्या एक एका स्पर्धकांचे खरे रंग समोर येत आहेत. अशातच घरात तृप्ती देसाई आणि सोनाली पाटील यांच्यामध्ये चांगलेच वाद झाले आहेत. मात्र, यानंतर घरातील इतर सदस्य देखील यात सामील होतात. नंतर सोनाली आणि तृप्तीचा वाद तिथेच संपतो. परंतु सोनाली आणि सुरेखा यांच्यात वाद होतात.

बिग बॉस मराठीच्या घरात किचनमध्ये सोनाली, शिवलीला, मीनल आणि विशाल काम करत असतात. त्यावेळी शिवलीला चपात्या करत असते. किचन टीममध्ये असलेले सदस्य चपात्यांना लावण्यासाठी कोरडे पीठ ठेवायला विसरतात. त्यावेळी शिवलीला चपात्यांना तेल लावून चपात्या लाटत असते, तेव्हा तृप्ती तिथे येते आणि “तुम्ही असं कसं पीठ काढायला विसरलात,” असे म्हणते.

यावेळी सोनाली “चुकून झालं,” असं म्हणते. यावर तृप्ती म्हणते की, “जर मुलं ही गोष्ट विसरत नाही, तर मुली कसं काय विसरतात.” यानंतर त्यांच्यामध्ये खूप भांडणं होतात. यानंतर देखील सोनाली त्यांना बोलत असते. (Quarrel between trupti Desai and sonali patil in bigg Boss Marathi 3)

यावर तृप्ती म्हणते की, “सोनाली मी ऐकून घेतीये म्हणून काहीही बोलू नकोस.” यावर सोनाली म्हणते की, “मग नका ऐकून घेऊ. सारखं महिला महिला करायचं. महिला महिला आणि भांडायला नंबर पहिला.” या भांडणानंतर घरातील सगळे सदस्य येतात आणि त्या दोघींना समजावू लागतात. यावर सुरेखा सोनालीला सांगतात की, “मोठ्यांशी या भाषेत बोलू नकोस.” त्यावेळी सोनाली त्यांना म्हणते की, “प्लीज तुमचं बोट खाली घ्या.” यानंतर सुरेखा तिला म्हणतात की, “तू एकटीच खूप ग्रेट आहेस आम्ही बाकी सगळे मूर्ख आहोत.”

यानंतर त्या तेथून निघून जातात. आता वीकेंडला महेश मांजरेकर त्यांची चांगलीच शाळा घेताना दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सपना चौधरीला टक्कर द्यायला आली चिमुकली, तिचे ठुमके पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकम झक्कास’

-‘या’ तीन अभिनेत्रींनी केला ‘मनिके मागे हिते’ गाण्यावर जबरदस्त डान्स, शेवट पाहायला विसरू नका

-‘सौंदर्य ही शक्ती, तर स्माईल त्याची तलवार!’ वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान

हे देखील वाचा