Monday, June 17, 2024

Shaitaan : ‘शैतानचा परिणाम माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर, पत्नीच्या स्वभावात बदल’, आर माधवनचा खुलासा

सिनेसृष्टीत मॅडी या नावानं लोकप्रिय झालेला आर माधवन (R Madhavan) बऱ्याच काळानंतर चर्चेत आला आहे. दाक्षिणात्य अन् हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आर माधवन सध्या शैतान (Shaitaan) चित्रपटामुळं चर्चेत आला आहे. नुकतांच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. मात्र, या ट्रेलरचा परिणाम अभिनेत्याच्या व्यक्तीगत आयुष्यावर झाला असल्याचा खुलासा आर माधवनने कला.

शैतान या चित्रपटात माधवनने(R Madhavan) खलनायकाची भूमिका स्विकारली आहे. अंगावर काटा आणणाऱ्या ट्रेलरमध्ये अजय देवगण(Ajay Devgn) त्याची मुलगी आणि बायकोसोबत एका आलिशान घरात राहत असतो.

अशातच एक अनोळखी माणूस त्यांच्या घरी येतो. आणि तो अजयच्या मुलीवर जादूटोणा करतो. पुढे माधवन (R Madhavan) जे भयंकर कृत्य सांगेल त्या कृत्यांचं पालन ती मुलगी करते. त्यामुळे सर्वांच्या मनात घबराट होते. अजय माधवनवर प्रचंड संतापतो. असे पाहायला मिळते. हा ट्रेलर चाहत्यांच्याच नव्हे तर माधवनच्या पत्नीच्यादेखील अंगावर काटा आला आहे.

एका मुलाखतीदरम्यान आर माधवन म्हणाला, शैतान चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यामुळं माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम झाला आहे. आर माधवन म्हणाला, चित्रपटातील माझा क्रुर अवतार पाहून पत्नीचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. चित्रपटानंतर जेव्हा मी तिच्याशी बोलायला जातो तेव्ही ती हलक्या स्वरात अंतर ठेवण्यास सांगते. असं माधवन मजेत सांगतो.

गुजराती चित्रपट ‘वश’ चा ‘शैतान’हा हिंदी रिमेक आहे. क्रिश्नदेव याज्ञिक यांनी गुजराती चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एक सामान्य कुटुंब व्हॅकेशनसाठी एका गावात जाऊन राहतं. तिथे एक अज्ञात माणूस येऊन त्यांच्या मुलीवर काळी जादू करतो. यादरम्यान कशा भयानक आणि विचित्र घटना घडतात हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित करण्यात येणार आहे. विकास बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच अजय देवगन(Ajay Devgn), ज्योती देशपांडे, कुमार पाठक आणि अभिषेक पाठक यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अजय देवगन, ज्योतिका आणि आर माधवन(R Madhavan) हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा:

Shaitaan Trailer Out: राक्षस घरी येणार अन्….’शैतान’चा ट्रेलर रिलीज

इतक्या श्रीमंत सोनू सूदच्या डिनरचे बिल भरलं एका अनोळख्या व्यक्तीने; नेमकं काय घडलं?

हे देखील वाचा