Sunday, December 3, 2023

‘रावण वाईट होता… पण वेल्डर नव्हता’, आदिपुरुषचा हा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल, नक्की पाहा

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष‘ रिलीज झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. वादानंतरही या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. 16 जून रोजी रिलीज झाल्यापासून हा चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. मात्र, असे असले तरी काही लाेक चित्रपटाच्या संवादांपासून ते व्हिज्युअलपर्यंत सोशल मीडियावर बरीच टीका होत आहे. इतकंच नाही, तर चित्रपटातील पात्रांच्या पेहराव आणि स्टाईलवरूनही त्याला खूप ट्रोल केलं जात आहे.

आदिपुरुष (adipurush) चित्रपट हिंदी, तामिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशात हा चित्रपट तब्बल 6200 स्क्रीन्सवर दाखवण्यात येत आहे. ‘आदिपुरुष’ला मिळालेला नकारात्मक प्रतिसाद आश्चर्यकारक आहे, पण तरीही या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 140 कोटींची दमदार कमाई केली आहे. दरम्यान, चित्रपटातील एक क्लिप ट्विटरवर तुफान व्हायरल हाेत आहे.

व्हायरल क्लिपमध्ये रावण चेहऱ्यावर मास्क लावून दिसत आहे. अशात चाहते यावर भन्नाट कमेंट करत आहेत. एका युजने कमेंट कर लिहिले की, “रावण खूप वाईट होता, पण त्याने कधीच वेल्डिंगचे काम केले नाही.”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले की, “माेदीजी है ताे सब मुमकिन हैं.” अशात एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “हा कलयुग रावण आहे.” अशा प्रकारे साेशल मीडिया युजर्स या व्हिडिओवर भिन्नभिन्न कमेंट करत आहेत.

यासाेबतच ‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यानंतर अनेक हिंसाचाराच्या घटनाही समाेर आल्या आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, एका सिनेमागृहात एका व्यक्तीने हनुमानासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर बसायचा प्रयत्न केला. यावर आजूबाजूच्या लोकांनी आक्षेप घेतला अन् बाचाबाची झाल्याची बातमी समाेर आली.(‘Raavan was bad… but he was not a welder’, this video of Adipurush is going viral)

अधिक वाचा- 
झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा टिझर रिलीज, स्टारकिड्सच्या धमाल शैलीने जिंकली चाहत्यांची मने
‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर संतापले मुकेश खन्ना; प्रभासच्या अभिनायावरही केली जाेरदार टिका

हे देखील वाचा