Friday, December 8, 2023

‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर संतापले मुकेश खन्ना; प्रभासच्या अभिनायावरही केली जाेरदार टिका

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष‘ रिलीज झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. वादानंतरही या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. 16 जून रोजी रिलीज झाल्यापासून हा चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. मात्र, असे असले तरी काही लाेक चित्रपटातील संवादांवरून संताप व्यक्त करत आहे. दरम्यान, मुकेश खन्ना यांनीही या चित्रपटाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुकेश खन्ना (mukesh khanna) यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ‘आदिपुरुष’ बद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी संताप व्यक्त केला आणि म्हटले की, “हनुमानाचा संवाद ऐकल्यानंतर असे वाटते की, कोणीतरी टपोरी बोलत आहे. रामायणातील पात्रे अशी बोलतात का?” मुकेश खन्ना पुढे म्हणाले की, “ओम राऊत यांना रामायणाचे ज्ञान नाही असे दिसते. लेखक मनोज मुंतशीर यांनी हे रामायण कलियुगी बनवले आहे. बर्‍याच लोकांना वाईट वाटेल, पण जेव्हा आपल्या धर्माबद्दल काही घडते, तेव्हा मी नेहमीच उभा राहतो.”

ते पुढे म्हणाले की, “चित्रपटाच्या निर्मितीमध्ये फारच खालच्या पातळीचे संवाद लिहिले गेले आहेत. यासोबतच हनुमानजीचे पात्रही अतर्क्य स्वरूपात दाखवण्यात आले आहे. या सगळ्यासाठी इतिहास निर्मात्यांना कधीच माफ करणार नाही.  प्रभास चांगला अभिनेता आहे. त्यांनी बाहुबली हा चित्रपट केला आहे. मात्र, हा चित्रपट वेगळा होता. श्रीराम बनण्यासाठी रामाचे आचरण स्वतःच्या आत आणावे लागते, तरच त्या पात्राशी नाते जोडता येते. केवळ शरीर तयार करणे पुरेसे नाही. तुम्हाला प्रेरणा हवी असेल, तर तुम्ही रामायणातील अरुण गोविल पाहिला असेल.”

ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चांगलाच वादात सापडला आहे. चित्रपटाच्या संवादांपासून ते व्हिज्युअलपर्यंत सोशल मीडियावर बरीच टीका होत आहे. इतकंच नाही, तर चित्रपटातील पात्रांच्या पेहराव आणि स्टाईलवरूनही त्याला खूप ट्रोल केलं जात आहे. अशात एकापाठोपाठ एक हा चित्रपट नव्या वादात सापडताना दिसत आहे. (tv actor mukesh khanna angry on adipurush makers says its horrible films dialogues styles its like kalyugi ramayana)

अधिक वाचा- 
झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा टिझर रिलीज, स्टारकिड्सच्या धमाल शैलीने जिंकली चाहत्यांची मने
“आधुनिकता आणि पौराणिक कथांच्या..”,’आदिपुरुष’ चित्रपटावर अरुण गोविल यांनी सोडलं मौन

हे देखील वाचा