Tuesday, June 24, 2025
Home अन्य प्रेक्षकांच्या लाडक्या ऑनस्क्रीन कृष्णाने दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा; खास संदेश शेअर करत म्हणतोय…

प्रेक्षकांच्या लाडक्या ऑनस्क्रीन कृष्णाने दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा; खास संदेश शेअर करत म्हणतोय…

सध्या ‘स्टार भारत’ या चॅनलवर पौराणिक मालिका ‘राधा कृष्ण’ दाखवली जाते. ही मालिका मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. दीर्घकाळ चालणारा हा शो आता प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. ‘राधा कृष्ण’ या मालिकेने कृष्ण आणि राधाच्या प्रेमकथेद्वारे आपल्या प्रेक्षकांचे सतत मनोरंजन केले आहे. हा शो भारतीय टेलिव्हिजनचा सर्वोत्तम ऐतिहासिक शो मानला जातो. आज जन्माष्टमीच्या विशेष प्रसंगी, टीव्हीचा सर्वात लाडका, कृष्णाची भूमिका निभावणारा अभिनेता सुमेध मुदगलकरने त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. सुमेधने आपल्या चाहत्यांना आणि राधाकृष्ण या मालिकेच्या प्रेक्षकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन आपले प्रेम व्यक्त केले आहे.

अभिनेता सुमेध मुदगलकरने अनेक वेळा नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. याच्या विरुद्ध तो सध्या स्टार भारतवर खोडकर आणि चंचल कृष्णाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे त्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. तो सर्वात प्रिय पात्रांपैकी एक बनला आहे. सुमेध ‘राधा कृष्ण’च्या सुरुवातीपासून कृष्णाची भूमिका साकारत आहे. दरम्यान जन्माष्टमीच्या या पवित्र सणानिमित्त सुमेध मुदगलकरने चाहत्यांसोबत एक खास संदेश शेअर केला आहे. (Krishna, the darling of the audience, wished him a happy Janmashtami and also expressed his gratitude)

सुमेध म्हणाला की, “जन्माष्टमी हा असा सण आहे, जो आपण सर्व लहानपणापासून साजरा करत आलो आहोत. हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास सणांपैकी एक आहे. आता मी भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे प्रत्येकाला असा वाटतं की, मी त्याच्या जन्माष्टमी उत्सवांचा एक भाग असावं. पण जर माझ्याकडे कृष्णासारखी शक्ती असती, तर मी नक्कीच हा आनंददायक प्रसंग माझ्या प्रेक्षकांसह आणि चाहत्यांसह साजरा केला असता.”

प्रेक्षकांप्रती असलेल्या प्रेमाची कबुली देत सुमेध पुढे म्हणाला की, “तुम्हा सर्वांकडून मिळालेल्या प्रेम आणि सन्मानाबद्दल मी कृतज्ञ आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी भगवान कृष्णाचा आभारी आहे. हा काळ खूप कठीण आणि अडचणींनी भरलेला आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो की, ही जन्माष्टमी सुरक्षितपणे आणि कोव्हिड -१९ प्रोटोकॉल लक्षात घेऊन साजरी करावी. मला आशा आहे की, तुम्ही आपल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन कराल आणि सुरक्षित रहाल. तुम्हा सर्वांना सुरक्षित जन्माष्टमीच्या शुभेच्छा.”

सुमेध मुदगलकरने अभिनय क्षेत्रात ‘दिल दोस्ती डान्स’ या नृत्य-आधारित युथ शोमधून पदार्पण केले. जिथे त्याने राघव उर्फ राघवेंद्र प्रताप यांची भूमिका साकारली. त्यानंतर तो भारतीय ऐतिहासिक नाटक ‘अशोक सम्राट’ मध्ये युवराज सुशिमच्या नकारात्मक भूमिकेसाठी प्रसिद्ध झाला.

त्यानंतर सुमेध पुढे २०१६ मध्ये ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटात दिसला होता. त्यानंतर‘मांझा’ या चित्रपटात त्याने मुख्य अभिनेता म्हणून भूमिका साकारली. २०१८ मध्ये, सुमेधने ‘बकेट लिस्ट’या चित्रपटात सलीलची भूमिका साकारली. अलीकडेच, त्याने ‘मन येड्यागत झालं’ या मराठी चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

हे देखील वाचा