Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड ‘पुरुष प्रधान आहे टॉलीवुड फिल्म इंडस्ट्री; राधिका आपटेचा ‘तो’ वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

‘पुरुष प्रधान आहे टॉलीवुड फिल्म इंडस्ट्री; राधिका आपटेचा ‘तो’ वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत सक्रीय असलेली अभिनेत्री राधिका आपटे (Radhika apte) सध्या चर्चेत आली आहे. राधिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने तेलुगू सिनेसृष्टीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहते संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

राधिकाने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. दमदार आणि हटके अभिनय साकारत तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, राधिकाने तेलगु सिनेसृष्टीबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. राधिकाने आत्तापर्यंत हिंदी, तमिळ आणि तेलुगूसह अनेक भारतीय भाषांमधील चित्रपटात काम केलं आहे.

व्हायरल होणारा व्हिडीओ एका मुलाखतीमधील आहे. ज्यामध्ये राधिकाने तेलुगू सिनेसृष्टी पुरुष प्रधान असल्याचे म्हटले आहे. तसेच या सिनेसृष्टीत काम करताना आलेला अनुभवदेखील शेअर केला आहे.

काय म्हणाली आहे राधिका?
‘मला सर्वात जास्त संघर्ष करावा लागणारी सिनेसृष्टी म्हणजे तेलुगू. कारण ही सिनेसृष्टी अतिशय पितृसत्ताक आहे. एक प्रकारे ते पुरुषप्रधान आहे. पुरुष आंधळे राष्ट्रवादी आहेत. तिथे महिलांना ज्या पद्धतीने वागवले जाते ते असह्य आहे. तसेच ती पुढे म्हणाली, विशेष म्हणजे यांच्या चित्रपटांमध्ये मी जी भूमिका साकारलीय त्यामध्ये मला ‘माझा पती देवा सारखा आहे’ असं डॉयलॉग बोलावे लागत होते.

सेटवर तुम्हाला अनोळखी व्यक्ती असल्यासारखं वागवलं जातं. अभिनेत्रीची कधी विचारपूसदेखील करत नाहीत. उलट, सेटवर अभिनेत्याची मनं जपली जातात. अभिनेता सध्या चांगल्या मूडमध्ये नाही. त्याला चहा घ्यायचा आहे. असी कारणं दिली जातात. मी या सिनेसृष्टीत सतत संघर्ष केला. आता मी ते सोडून दिले आहे. हे फक्त माझ्याच बाबतीत घडतंय असं मला वाटतं. अशी खंतही राधिका आपटेने व्यक्त केली आहे.

राधिकाचे हे वक्तव्य जुनं आहे. हा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यामध्ये काहींनी राधिकाच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे तर काहींनी तेलुगू सिनेसृष्टीला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

पुन्हा विचार कर… ईशा देओलच्या घटस्फोटामुळे धर्मेंद्र यांना धक्का
एक खोटारडी.. तर दुसरी कोण असेल? ‘विश्वामित्र’मधील अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा