‘तारक मेहता का उलटा चष्मा’मधून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री सुरभी चंदना. ” नागिन 5″मधुन प्रसिद्धी झोतात आली आणि आता नवनवीन मालिकांमधून ती चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. नुकताच तिने एका एअरलाइनवर मानसिक छळाचा आरोप केला आहे. हा आरोप X या समाजमाध्यमातुन ट्विट(tweet) करत तिने केला आहे.
टाटा समुहाच्या(tata group) एअरलाइनवर आरोप
शनिवारी, 13 जानेवारीला तिने हे ट्विट केले होते. हा आरोप टाटा सन्स आणि सिंगापुर एअरलाइनच्या(singapore Airline) मालकीची कंपनी, विस्तारा एअरलाइनवर करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये तिने लिहिले होते, “सर्वात वाईट एअरलाइन हा पुरस्कार एअरविस्ताराला दिला जातो. त्यांनी माझी प्रायोरीटी बॅग त्यांना माहीती असलेल्या बेस्ट कारणाने ऑफलोड केली.” निराशा व्यक्त करत तिने पुढे असंही लिहिलं की, त्यांनी माझा पुर्ण दिवस वाया घालवला आहे आणि मला अजुनही खात्री नाही की माझी बॅग माझ्या आईच्या घरी पोहोचेल की नाही. ” तिने शेवटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडुन गैरव्यवहार झाल्याचेही तिने या ट्वीटमध्ये लिहिले.
अत्यंत असभ्य आहे ग्राउंड स्टाफ
एका वेगळ्या पोस्टमध्ये, तिने मुंबई विमानतळावरील(mumbai airport) एअरलाइनच्या ग्राउंड स्टाफवर अत्यंत असभ्य असल्याचा आरोप केला आहे. तिने लिहिले की, ‘विस्ताराच्या मुंबई विमानतळाची ग्राउंड स्टाफ दीपिका पवार अत्यंत अनप्रोफेशनल आणि कमी प्रशिक्षित आहे. ती माझ्याशी अतिशय उद्धटपणे बोलली आणि तिने, तुमची बॅग कधी येईल हे आम्हाला माहीत नाही आणि आम्ही काहीही करू शकत नाही, असं सांगितलं. तसंच डिलीवरीबाबत विचारल्यावर तिने सांगितले की, आमचा डिलीवरी करणारा माणूस व्यस्त असून मी तुम्हाला बॅग पोहोचवू शकणार नाही. बॅग घ्यायला आलात तर बरे होईल. विमान कंपनीची चुक असुनही असे वर्तन करणारी, एअरविस्ताराची कर्मचारी आणि सेवा निरुपयोगी आहे.
युजरदेखील नोंदवतायत प्रतिक्रिया
या ट्विटला रीट्विट करत एअरविस्ताराने(Airvistara) सुरभीला आश्वासन दिले की, तिच्या तक्रारीला प्राधान्य देऊन लवकरात लवकर तिचे निवारण केले जाईल. परंतु अभिनेत्रीने कंपनीच्या या ट्विटलाही प्रतिउत्तर दिले आहे. यावर तिने(surbhi chandna) लिहिले,मला मानसिक त्रास दिल्यानंतरही, ते बॅग पाठवण्यासाठी एका माणसाची सोय करु शकतील की नाही याची त्यांना खात्री नाही.हा विषय सध्या x या सोशल मिडीया साइटवर खुपच वादाचा विषय ठरला आहे. सुरभीच्या या ट्विटवर तिला सहमत असणारे आणि असहमती दर्शवणारे अशा दोन्ही युजरसच्या कमेंटस दिसत आहेत. काही युजर एअरविस्ताराने प्रवास करतानाचे त्यांचे अनुभव शेअर करत आहेत तर काही युजर एअरविस्तारा बेस्ट एअरलाइन असल्याचे सांगत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
पहिल्यांदाच अंकिता-सुशांतच्या नात्यावर बोलला विकी जैन; म्हणाला, ‘तुझ्या अफेअरचे परिणाम मला भोगावे लागले…’
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घर बांधण्यासाठी केली जागा खरेदी, जाणून घ्या अयोध्येतील जागेचे भाव