Saturday, May 11, 2024

‘ही सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात आली अन् …’, राघव चढ्ढाने परिणीतीसाठी शेअर केली खास पाेस्ट, फाेटाे व्हायरल

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा त्यांच्या एंगेजमेंटनंतर सतत चर्चेत आहेत. अशात अलीकडेच अभिनेत्रीने एंगेजमेंटचे फोटो शेअर करत राघवला तिचा जीवन साथीदार म्हणून कसे निवडले ते सांगितले. अशात आता राघवने देखील त्याच्या हाेणाऱ्या बायकाेसाठी एक खास नोट शेअर केली आहे. नाेटमध्ये काय म्हणाला राघव? चला, जाणून घेऊया…

राघवने शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे क्यूट कपल एंगेजमेंट एन्जॉय करताना दिसत आहे. फोटो शेअर करत राघवने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आणि एक अद्भुत दिवस, एका सुंदर मुलीने माझ्या आयुष्यात प्रवेश केला, तिच्या हसण्याने, प्रेम आणि सहवासाचे वचन दिले. अशात यात काहीही आश्चर्य नाही की, आमची एंगेजमेंट हा एक आनंदाचा प्रसंग होता. आनंदाश्रू,आनंद,मजा आणि नृत्याने आमच्या जवळच्या आणि प्रियजनांना जवळ आणले. पंजाबी पद्धतीने.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Chadha (@raghavchadha88)

राघवने परिणीतीसाठी ही खास पोस्ट शेअर करताच अभिनेत्रीने लगेचच त्यावर प्रतिक्रिया देत हेणाऱ्या नवऱ्याची पाेस्ट लाईक केली. त्यासाेबतच राघवच्या सासूने पाेस्टवर हार्ट इमाेजी टाकला. इतकेच नव्हे तर, चाहतेही या खास पाेस्टवर लाईक आणि कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Chadha (@raghavchadha88)

मंडळी, राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राने 13मे रोजी दिल्ली येथील कपूरथला येथे एंगेजमेंट केली हाेती. या एंगेजमेंटमध्ये बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री आणि परिणीतीची बहिण प्रियांका चाेप्रा हिनेही हजेरी लावले हाेती, ज्याचे फाेटाे साेशल मीडिायवर चांगलेच व्हायरल झाले. एंगेजमेंटपूर्वी राघव अन् परिणीती अनेकदा डिनर डेटवर स्पॉट झाले होते.(raghav chadha shares special note for actress and his wife to be parineeti chopra with unseen pictures )

हे देखील वाचा