राहुल देशपांडे हे एक लोकप्रिय गायक आहेत. त्यांच्या चाहत्यांचा मोठा वर्ग आहे. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यांचा ‘वसंतोत्सव’ कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. राहुल देशपांडे सध्या अमेरिकेत त्यांच्या ‘वसंतोत्सव’ कार्यक्रमाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो स्क्रॅम्बल्ड एग बनवताना दिसत आहेत. या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओमध्ये राहुल देशपांडे (Rahul Deshpande)स्क्रॅम्बल्ड एग बनवताना खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. त्यांनी बनवलेली डिश चविष्ट होती आणि त्यालाही ती खूप आवडली. पण काही नेटकऱ्यांना राहुल देशपांडे यांनी अंड्याची डिश बनवली आणि खाल्ली यावर आक्षेप आहे. त्यांना वाटते की राहुल देशपांडे हे ब्राह्मण आहेत आणि त्यांनी अंड्यासारखी मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे.
एका नेटकऱ्याने लिहिलं, “ब्राह्मण फक्त नावालाच का? मी चाहता होतो तुमचा पण आता नाही.” तर दुसऱ्याने म्हणाला, “मी तुम्हाला अनफॉलो करत आहे.” तर तिसऱ्याने लिहिलं, “तुमच्या आवाजात साक्षात पांडुरंगाचे दर्शन होते…प्रत्येक पंढरीचा वारकरी तुम्हाला देव मानतो…लहान तोंडी मोठा घास, माफ करा सर पण, आपल्या सारख्या व्यक्तीला हे शोभा देत नाही.”
View this post on Instagram
राहुल देशपाडेने या ट्रोलिंगला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यांचे अनेक चाहत्यांनी त्याला या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं आहे. एका चाहत्याने लिहिलं, “ट्रोलर्सकडे लक्ष देऊ नका. तुम्ही खूप छान गायक आहात आणि तुमच्या चाहत्यांना तुमची अशी कोणतीही डिश आवडेल.” तर दुसऱ्याने म्हणाला, “तुम्ही जे काही करता ते मनापासून करता. तुमच्यावर कोणतीही बंधनं नाहीत. तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे आवडते ते करा.” (Rahul Deshpande trolled because of that video shared from America)
आधिक वाचा-
–‘कुमकुम’ मालिकेतून ओळख मिळवलेल्या हुसैन कुवाजरवालाने अभिनयातून घेतला मोठा ब्रेक
–‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ मधील प्रेमगीत प्रदर्शित, सोनाली कुलकर्णी म्हणतेय ‘मी एकटी’