प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेंचे ‘माझे विठ्ठल रखुमाई’ गीत रसिकांच्या भेटीला; घरबसल्या घडणार विठुरायाचे दर्शन


कोणत्याही सणवारानिमित्त नेहमीच वेगवेगळी गाणी प्रदर्शित होत असतातच. तसेच प्रदर्शित झालेल्या या गाण्यांनाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असते. अशातच कोरोना व्हायरसमुळे मागील वर्षी वारकऱ्यांना आपल्या विठुरायाचे दर्शन भेटले नव्हते. मात्र, आता आपल्या विठुरायाचे दर्शन चाहत्यांना घरबसल्या मिळणार आहे. कारण आषाढी एकादशीचे औचित्य साधत एक मराठी गीत प्रदर्शित करण्यात आले आहे. ज्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.

आषाढी एकादशीचे औचित्य साधत स्वरनील एंटरटेनमेंट्सचे निलेश माटे यांच्या वतीने ‘माझे विठ्ठल रखुमाई’ या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. (New Marathi Bhaktigeet Majhe Vitthal Rakhumai Song By Singer Rahul Deshpande)

शनिवारी (१७ जुलै) पुण्यात या गीतासंदर्भात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी गीताचे गायक राहुल देशपांडे, अभिनेते राहुल सोलापूरकर, आनंद इंगळे, स्वरनील एंटरटेनमेंट्सचे नीलेश माटे, युवा संगीतकार सुयश खटावकर, गीतकार देवदत्त भिंगारकर, संगीत संयोजक तेजस चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

“सोपे शब्द आणि सहज लक्षात राहणारी चाल या दोन गोष्टी कोणत्याही गाण्याचा आत्मा असतो. याच दोन्ही गोष्टींचा मिलाफ झाल्याने ‘माझे विठ्ठल रखुमाई’ हे गीत नक्कीच रसिकांच्या पसंतीस उतरेल,” असा विश्वास प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना नीलेश माटे म्हणाले की, “विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन सध्या घेता येत नसल्याने हे स्वरदर्शन भक्तांना आनंद देईल. स्वरनील या गीताच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात उतरत असून ही पहिलीच कलाकृती आपणासमोर सादर करताना आनंद होत आहे.”

यावेळी बोलताना संगीतकार सुयश खटावकर म्हणाले, “या गीताच्या माध्यमातून विठुरायाच्या चरणी संगीतसेवा रुजू करत आहोत. काही चालीवर काम करताना नेहमीच समाधान जाणवते, याचीच फलश्रुती म्हणजे हे गीत आहे.”

यावेळी बोलताना गीतकार देवदत्त भिंगारकर म्हणाले की, “गीतासाठी शब्द लिहिताना नेहमीच कस लागतो. मात्र, या गीतासाठी मनातील शब्द कागदावर उतरल्याने निश्चित समाधान आहे.”

या गीताचा प्रीमियर ‘स्वरनील एन्टरटेन्मेंट्सच्या’ यूट्यूब पेजवरून शेअर करण्यात आला.

विशेष म्हणजे स्वरनील एन्टरटेन्मेंट्स यांची ही पहिलीच निर्मिती आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये हवायें, गुनगुनाए, पूछे तू है कहाँ!’ शिवानी बावकरच्या दिलखेचक अंदाजावर चाहते फिदा

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’

-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’


Leave A Reply

Your email address will not be published.