Friday, December 8, 2023

‘कुमकुम’ मालिकेतून ओळख मिळवलेल्या हुसैन कुवाजरवालाने अभिनयातून घेतला मोठा ब्रेक

स्टार प्लस या वाहिनीवरील ‘कुमकुम’ या मालिकेमधून घराघरात पोहचलेला अभिनेता हुसैन कुवाजरवाला गुरूवारी (12 ऑक्टोबर) त्याचा 56 वा वाढदिवस साजरा करतो. टीव्ही मालिकांमधील तो एक हँडसम आणि आकर्षक अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तो छोटा पडदा चांगलाच गाजवत आहे.

हुसैनचा जन्म 12 ऑक्टोबर 1977रोजी मुंबईमध्ये झाला. सुरुवातीला काही काळ तो त्याच्या गुडलुकमुळे बराच चर्चेत आला. साल 1996 मध्ये त्याने छोट्या पडद्यावर ‘हम पांच’ या मालिकेमधून अभिनयात पहिले पाऊल टाकले. ही एक विनोदी मालिका होती. ‘क्यू की सास भी कभी बहू थी’ या प्रसिद्ध मालिकेमध्ये देखील तो झळकला. त्याच्या दमदार अभिनयासह तो एक उत्तम सूत्रसंचालक म्हणून देखील ओळखला जातो. आजवर त्याने ‘खुलजा सिम सिम’, ‘कहो ना यार है’, ‘सास वर्सेस बहू’, ‘पती पत्नी और वो’ अशा अनेक मालिकांमध्ये अभिनय केला आहे. एवढेच नाही तर त्याने नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. साल 2013मध्ये त्याचा ‘श्री’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

हुसैन आणि त्याची पत्नी टिना हे दोघे ‘नच बलिये’ मध्ये देखील झळकले होते. साल 2006 मध्ये ‘नच बलिये 2’ चा तो विजेता देखील झाला. त्याने ‘खतरों के खिलाडी’ मध्ये देखील सहभाग घेतला होता. साल 2007 रोजी तो ‘इंडिअन आयडल जूनिअर’च्या दुसऱ्या पर्वाचा तो सूत्रसंचालक होता.

हुसैन कुवाजरवालाने एका मुलाखतीमध्ये त्याच्या प्रेमाचा खुलासा केला होता. त्यावेळी तो म्हणाला होता की, “टिना आणि मी शाळेपासून एकत्र आहोत. आम्ही दोघे एकाच बेंचवर बसायचो. यानंतर टिनाने मला प्रपोज केले. मी लगेच तिला हो म्हणालो. 9 वर्षे एकत्र घालवल्यावर आम्ही दोघांनी लग्न केले.”

‘जंगूरा- द जिप्सी प्रिंस’ या शोमध्ये अभिनेत्याला मुख्य भूमिका मिळाली होती. त्यावेळीच त्याने मोठा ब्रेक घेतला. हा बॉलिवूडचा एक म्युझिक शो होता. हा शो गुरुग्रामच्या नौटंकी महेल आणि किंगडम ऑफ ड्रीम्समध्ये होत होता. या मध्ये कश्मीरा ईरानी, गौहर खान, सदानंद पाटिल हे देखील होते. यामध्ये श्यामक डावर कोरिओग्राफी करायचा. हुसैन नुकताच ‘कुछ स्माइल हो जाए’ या सिरीजमध्ये झळकला होता.

हेही नक्की वाचा-
जेव्हा लीक झाले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटो, तर ‘या’ कारणामुळे केलं होतं अभिनेत्रीने धर्मपरिवर्तन
अरे बापरे! विद्या बालनला घाबरून अक्षय कुमारच्या मुलाचा उडायचा थरकाप; जाणून घ्या कारण

हे देखील वाचा