Wednesday, October 9, 2024
Home बॉलीवूड श्वेता, डिंपीनंतर आता तिसऱ्या पत्नीलाही घटस्फोट देतोय राहुल महाजन? वाचा सविस्तर

श्वेता, डिंपीनंतर आता तिसऱ्या पत्नीलाही घटस्फोट देतोय राहुल महाजन? वाचा सविस्तर

अभिनेता राहुल महाजन कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. तो मागील अनेक दिवसांपासून लाइमलाईटपासून दूर आहे. पण तरीही अनेक वेळा तो प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनत असतो. त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे देखील तो खूप चर्चेत आला होता. २०१८ मध्ये त्याने कजाकिस्तानमधील एका मॉडेलसोबत तिसऱ्या वेळेस लग्न केले. राहुल हा ‘बिग बॉस १४’ चा स्पर्धक देखील होता. तिथे त्याचे राखी सावंतसोबत अनेकवेळा भांडण पाहायला मिळाले होते. आता राहुल त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

राहुल (Rahul Mahajan) त्याची तिसरी पत्नी नताल्या इलिनाला घटस्फोट देणार असल्याची बातमी समोर आली आहे. होय, लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप या जोडप्याने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. गेल्या वर्षी त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचा दावा माध्यमातील वृत्तानुसार केला जात आहे. त्यांचे लग्न झाले तेव्हा त्या दोघांचे पटत नसल्याचे बोलले जात होते.

राहुल आणि नताल्याने आपले लग्न टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, या जोडप्याचा घटस्फोट होणारच का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण हे खर असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे नताल्या ही राहुलची तिसरी पत्नी आहे. यापूर्वी त्याने श्वेता सिंगसोबत लग्न केले होते. यानंतर राहुलने ‘राहुल दुल्हनिया ले जायेगा’ या रिअॅलिटी शोमध्ये डिम्पी गांगुलीची भेट घेतली. दोघांनी 2010 मध्ये लग्न केले आणि 2015 मध्ये घटस्फोट घेतला. दोन लग्न मोडल्यानंतर त्याने कझाकिस्तानी मॉडेल नताल्यासोबत लग्न केले, मात्र आता त्याचे तिसरे लग्न मोडल्याचीही बातमी समोर येत आहे.

माध्यमातील सुत्रांनुसार, राहुलची तबेत तिसऱ्या घटस्फोटानंतर बिघचली आहे. पण आता तो ठिक आहे. दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर राहुलने बोलण्यास नकार दिला आहे. तो म्हणाला की, “मला माझे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायचे आहे. मला कोणत्याही गोष्टीवर भाष्य करायला आवडणार नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे,याबद्दल मी माझ्या मित्रांशी चर्चाही करत नाही.” त्याच्या या वक्तव्यानंतर अनेक भ्रम निर्माण झाले आहेत. (Rahul Mahajan is now divorcing his third wife after Shweta and Dimpy)

अधिक वाचा- 
भारीच ना! हॉरर कॉमेडीपट ‘सुस्साट’चे लंडनमध्ये शूटिंग सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती
‘घूमर’चा दमदार टीझर लाॅन्च; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा