स्वयंवर करूनही राहुल महाजन रमला नाही संसारात; तीन लग्न केलेल्या अभिनेत्यावर पत्नीने लावले होते घरगुती हिंसाचाराचे आरोप


अभिनेता राहुल महाजन कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. तो मागील अनेक दिवसांपासून लाइमलाईटपासून दूर आहे. पण तरीही अनेक वेळा तो प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनत असतो. त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे देखील तो खूप चर्चेत आला होता. २०१८ मध्ये त्याने कजाकिस्तानमधील एका मॉडेलसोबत तिसऱ्या वेळेस लग्न केले आहे. राहुल रविवारी (२५जुलै) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया त्याचा बाबत काही गोष्टी.

राहुलने पायलट श्वेता सिंगसोबत पहिले लग्न केले होते. परंतु त्याचे लग्न दोन वर्ष देखील टिकले नाही आणि त्या दोघांच्या काही वैयक्तिक कारणांवरून त्यांचा घटस्फोट झाला.

श्वेतासोबत घटस्फोट झाल्यानंतर राहुलने त्याचे स्वयंवर रचले होते. यानंतर तो खूपच चर्चेत आला होता. त्याच्या स्वयंवरचे सगळे एपिसोड टीव्हीवर टेलिकास्ट देखील करण्यात आले होते. यात अनेक सुंदर तरुणींनी भाग घेतला होता. शेवटी राहुलने डिंपी गांगुलीला त्याची जीवनसंगिनी म्हणून निवडले होते. परंतु त्याचे हे लग्न देखील जास्त काळ टिकू शकले नाही. डिंपीने त्याच्यावर घरगुती अत्याचाराचा आरोप लावला होता. लग्नाच्या काही वर्षातच ते वेगळे झाले होते. (Birthday special : let’s know about Rahul Mahajan’s marriage life)

त्याचे दुसरे लग्न मोडल्यानंतर राहुलने २०१८ साली कजाकिस्तानमधील एका मॉडेलसोबत लग्न केले. त्याच्या तिसऱ्या पत्नीचे नाव नतालिया इलियाना आहे. खास गोष्ट म्हणजे, ती राहुलपेक्षा १८ वर्षांनी लग्न लहान आहे. त्यामुळे त्यांचे हे लग्न खूप चर्चेत आले होते.

राहुल हा ‘बिग बॉस १४’ चा स्पर्धक देखील होता. तिथे त्याचे राखी सावंतसोबत अनेकवेळा भांडण पाहायला मिळाले होते. या शोमध्ये राखी सावंतने त्याचे धोतर देखील फाडले होते. त्यामुळे ते दोघेही खूप चर्चेत आले होते.

राहुलने ‘कॉमेडी नाईटस विद कपिल’ या शोमध्ये काम केले आहे. तसेच त्याने ‘लॉर्ड ऑफ सिंगापूर’ या चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर तो त्याच्या स्वयंवरामुळे खूप चर्चेत आला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

खरंच की काय! रिया चक्रवर्तीला बॉलिवूड नाही, तर हॉलिवूडमधून मिळणार चित्रपटांमध्ये झळकण्याची संधी?

-सुहानाने स्विमिंग पूल जवळील हॉट फोटो केले शेअर; आई गौरीने केले क्लीक, तर शाहरुख म्हणतोय, ‘हा दिखावा आहे…’

मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.