Tuesday, June 25, 2024

‘घूमर’चा दमदार टीझर लाॅन्च; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

चित्रपट सृष्टीत एकापेक्षा एक खतरनाक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटाला येत आहेत. नुकताच बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘घूमर’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. काही सेकंदांच्या या टीझरमध्ये अभिषेक बच्चन प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. तर सैयामी खेर हातात चेंडू पकडताना दिसत आहे. ‘घूमर’ हा चित्रपट एका विकलांग खेळाडूची प्रेरणादायी कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आर बल्की यांनी केले आहे.

या चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीझ झाला आहे. 31 जुलै 2023 रोजी अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) या चित्रपटाची झलक सोशल मीडियावर शेअर केली. अभिषेकने पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले, ‘लेफटी है? लेफटी ही है!’ चित्रपटाच्या टीझरमधील अभिषेक बच्चनचा लूक खूपच प्रभावी आहे. तर सैयामी महिला क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. जिला हात नाही. टीझरची सुरुवात एका दमदार संवादाने होते. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्याशिवाय शबाना आझमी देखील दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका खास भूमिकेत दिसणार आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार, मेगास्टार अमिताभ या चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलचा भाग असणार आहेत. ‘घूमर’ (Ghoomar )हा चित्रपट क्रिकेटभोवती फिरत असून यात बिग बी समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याआधी अमिताभ आर बाल्की यांच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसले आहेत. ‘घूमर’ चित्रपट 18 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ज्याची घोषणा या टीझरसोबत करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

अभिषेकच्या या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत होते. नुकतेच त्याचे पोस्टरही रिलीज करण्यात आले, जे पाहून लोकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळाली असून, त्यामुळे लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. (Actor Abhishek Bachchan’s ‘Ghoomar’ teaser released)

अधिक वाचा- 
लग्न न करताच सलमानने बदलले कियाराचे नाव, नक्की काय आहे प्रकरण?
अभिनयाच्या पहिल्या नाही, तर दुसऱ्या संधीत चमकले होते कियारा आडवाणीचे नशीब; जाणून घ्या तिचा सिनेप्रवास

हे देखील वाचा