Sunday, December 15, 2024
[aioseo_breadcrumbs]

लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र ऍड फिल्ममध्ये काम करणार राहुल अन् दिशा; प्रोजेक्टच्या मालकाने केले जोडप्याचे कौतुक

बिग बॉस फेम गायक राहुल वैद्य याने १६ जुलैला अभिनेत्री दिशा परमारसोबत लग्न केले आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा कानावर येत आहेत. लग्नाच्या आधी झालेल्या सगळ्या सोहळ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच लग्नाचे आणि लग्नानंतरचे देखील सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांचा गृहप्रवेश, सत्यनारायणाची पूजा हे सगळे समारंभ त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले आहे. त्या दोघांनी लग्नाच्या आधी काही प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केले आहे. माध्यमातील वृत्तानुसार राहुल आणि दिशा पहिल्यांदाच एका ऍड फिल्ममध्ये काम करणार आहे. लग्नानंतर ते पहिल्यांदा एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत.

या जाहिरातीत दिशा नवरीच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच राहुल यामध्ये पतीच्या रोलमध्ये दिसणार आहे. ज्या ऍड फिल्ममध्ये ते काम करणार आहेत, त्याचे मालक असे म्हणाले की, “दिशा आणि राहुल एका परिवाराप्रमाणे दिसतात. ते दोघे अशा जोडप्याच्या रुपात ओळखले जातात, जे आधुनिक भारताचे प्रतिनिधित्व करतात. कारण हा प्रोजेक्ट देखील आधुनिक आहे. या आधुनिक प्रोजेक्टमध्ये हे दोघेही परफेक्ट आहे.” (Rahul vaidya and disha Parmar did their first project together after marriage)

राहुल आणि दिशाची लव्ह स्टोरी २०१८ मध्ये सुरू झाली. त्या दोघांनी सर्वात आधी इंस्टाग्रामवर चॅटिंग केली त्यानंतर ते दोघे खूप चांगले मित्र झाले. बिग बॉसच्या घरात असताना राहुलने सर्वांसमोर तिला प्रपोज केले होते. त्याचा तिने स्वीकार देखील केला होता. ते दोघे या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार होते, पण कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यांना तारीख पुढे ढकलावी लागली होती. त्या दोघांनी या आधी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

हे देखील वाचा