व्हिडिओ: लग्नापूर्वी राहुल अन् दिशाने केली पार्टी; मित्राने ‘असे’ म्हणताच लाजली अभिनेत्री


‘बिग बॉस 14’ चा उपविजेता राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार यांनी नुकतीच त्यांच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. ती म्हणजे ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत. त्यांनी सांगितले आहे की, ते दोघे 16 जुलैला लग्न करणार आहेत. अशातच लग्नाच्या आधी या रोमँटिक कपलने एक पार्टी केली आहे. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत.

राहुल वैद्यने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये राहुल आणि दिशा लग्नाच्या आधी त्यांच्या मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. तिथे त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती देखील उपस्थित होते. या व्हिडिओमध्ये एक मित्र दिशाला म्हणतो की, “भाभी जी घर पर है.” हे ऐकून दिशा लाजते आणि हसते. (Rahul vaidya and disha Parmar enjoy party with their friends, video and photos get viral)

राहुल आणि दिशाची लव्ह स्टोरी 2018 मध्ये सुरू झाली होती. त्या दोघांनी सर्वात आधी इंस्टाग्रामवर चॅटिंग केली त्यानंतर ते दोघे खूप चांगले मित्र झाले. बिग बॉसच्या घरात असताना दिशा परमार राहुलला भेटायला घरात गेली होती. दरम्यान त्याने सर्वांसमोर तिला प्रपोज केले होते. तिनेही तिथे लगेच स्वीकार देखील केला होता.

त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, नुकतेच राहुलचे ‘अली’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. तो जेव्हा बिग बॉसच्या घरात होता, तेव्हा त्याने हे गाणे लिहिले होते. तो काही दिवसांपूर्वी ‘खतरों के खिलाडी 13’ या शोची शूटिंग पूर्ण करून परत आला आहे. दिशा ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ आणि ‘वो अपना सा’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर


Leave A Reply

Your email address will not be published.