Wednesday, April 30, 2025
Home अन्य ‘मला फसवण्यात आले आहे…’, राज कुंद्राने लिहले पंतप्रधानांना पत्र, सीबीआय चौकशीची केली मागणी

‘मला फसवण्यात आले आहे…’, राज कुंद्राने लिहले पंतप्रधानांना पत्र, सीबीआय चौकशीची केली मागणी

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा याने केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) तक्रार केली असून, मुंबई गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला पोर्नोग्राफी प्रकरणात गोवले असल्याचा दावा त्याने आपल्या तक्रारीत केला आहे. राज कुंद्राने आपल्या तक्रारीत असाही दावा केला आहे की त्याच्याविरुद्धचा संपूर्ण खटला त्याच्या वैयक्तिक सूडबुद्धीने एका व्यावसायिकाने तयार केला होता, ज्याने मुंबईतील काही पोलिस अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्याला पोर्नोग्राफी रॅकेटच्या कथित खोट्या प्रकरणात अटक केली होती. राज कुंद्रा यांनी आपल्या तक्रारीत मागणी केली आहे की, सीबीआयने आपल्यावर दाखल केलेल्या याच गुन्ह्याची पुन्हा चौकशी करावी जेणेकरून न्याय मिळेल.

सूत्रांनी सांगितले की, राज कुंद्राने आपल्या तक्रारीत काही अधिकाऱ्यांची नावेही लिहिली असून ते पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठवले आहे. कोणत्याही पोर्नोग्राफीच्या निर्मितीशी आपला काहीही संबंध नाही किंवा त्यातून कोणताही पैसा कमावला नाही, असे त्याने म्हणले आहे. राजच्या म्हणण्यानुसार, हॉटशॉट अप त्याच्या भावजयीचे होते आणि ते अप अश्लील नव्हते.

तसेच त्याच्या कंपनीने फक्त तेच सॉफ्टवेअर दिले ज्यावर ओटीटी अप चालू शकते. पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकाही आरोपीशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा राज यांनी केला आहे. राज यांनी असा दावाही केला आहे की मुंबई पोलिसांनी 17 अॅप्सच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता, परंतु इतर कोणालाही हायलाइट करण्यात आले नाही, फक्त त्यांची बदनामी करण्यात आली.

अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
राज यांनी आपल्या तक्रारीत मुंबई क्राइम ब्रँचच्या काही अधिकार्‍यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत आणि म्हटले आहे की, या प्रकरणात दाखल केलेल्या पहिल्या 4000 पानांच्या आरोपपत्रात त्यांचे नाव नसतानाही, पोलिसांनी त्यांना या प्रकरणात गोवण्याचे सर्व काही केले. . या खटल्यातील प्रत्येक साक्षीदारावर आपल्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, असेही कुंद्राने म्हटले आहे. सूत्रांनी असेही सांगितले की कुंद्राने आपल्या तक्रारीत सीबीआयला सांगितले आहे की ते साक्ष देतील अशा अनेक साक्षीदारांची माहिती शेअर करू शकतात. तक्रारीनुसार, ज्या व्यावसायिकाच्या वतीने कुंद्राला गोवण्यात आले होते, त्याचे तत्कालीन पोलिसांशी जवळचे संबंध आहेत. काही पोलिसांनी आपला काळा पैसा त्या व्यावसायिकाकडे गुंतवल्याचा आरोपही कुंद्रा यांनी केला आहे.

कुंद्राने आपल्या तक्रारीत लिहिले आहे की, “मी एक वर्ष गप्प राहिलो आणि मीडिया ट्रायलपासून तोडलो, मी आर्थर रोड जेलमध्ये 63 दिवस काढले आहेत. मला न्यायालयाकडून न्याय हवा आहे, जो मला मिळेल, हे मला माहीत आहे, या अधिका-यांच्या विरोधात मी चौकशीची विनंती करतो.” दरम्यान, कुंद्राला 19 जुलै रोजी त्याचा सहकारी रायन थॉर्पसोबत अश्लील रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अलीकडेच राज कुंद्राने किल्ला न्यायालयात पोर्नोग्राफी प्रकरणी डिस्चार्ज अर्ज दाखल केला होता, त्यावर गुन्हे शाखेने कुंद्राच्या अर्जाला विरोध केला असून, कुंद्राविरुद्ध अनेक पुरावे असल्याचे सांगितले आहे, या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

हेही वाचा- अभिनेता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून शान आला होता इंडस्ट्रीत; वयाच्या १७ व्या वर्षी मिळाली गाण्याची संधी
अरर, गंडलं राव! 100 रुपयांच्या तिकिटाची जादू फसली; तीन दिवसात 10 कोटी छापू शकला नाही ‘ब्रह्मास्त्र’
‘धकधक गर्ल’ माधुरीसोबत ‘नॅशनल क्रश’ने धरला ठेका, व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय

 

हे देखील वाचा