Wednesday, March 22, 2023

‘धकधक गर्ल’ माधुरीसोबत ‘नॅशनल क्रश’ने धरला ठेका, व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय

झलक दिखला जा 10‘ हा डान्स रियॅलिटी शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या शाेमध्ये दर आठवड्याला वेगवेगळी थीम असते. या आठवड्यात स्पर्धक देशातील विविध भागातील संस्कृतीचे दर्शन घडवणार आहेत. यावेळी शाेमध्ये रश्मिका मंदान्ना खास पाहुणी म्हणून दिसली. अभिनेत्री तिचा आगामी चित्रपट ‘गुडबाय’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) हिच्यासोबत गाण्यावर नाचताना दिसत आहे. दोघींचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

माधुरी दीक्षितचा रश्मिका मंदान्नासोबत हा डान्स चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. चाहते व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एक चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “गुड बाय अँड मजा मा.” दुसऱ्या चाहत्याने कमेंट करत लिहिले, “माधुरी मॅम सर्वोत्कृष्ट.” हा व्हिडिओ साेशल मीडियावर जाेरदार व्हायरल हाेत आहे. त्याचवेळी रुबीना दिलैकने तिच्या होम टाऊन हिमाचल प्रदेशची संस्कृती आपल्या नृत्यातून दाखवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

हिमाचली लूकमध्ये अभिनेत्री रुबीना खूपच सुंदर दिसत आहे. रुबीनाने सर्व जजसोबत हिमाचलचा खास डान्स केला आहे. तिची शैली प्रेक्षकांना खूप आवडली. ‘बॉस लेडी’ रुबीनाची स्वतःची वेगळी शैली आहे. सर्व स्पर्धकांनी आपल्या नृत्यातून विविध राज्यांची संस्कृती दाखवली. आगामी एपिसोड्स खूप छान असणार आहेत. शोमध्ये नोरा फतेही अमृता खानविलकरसोबत नऊवारी साडीत लावणी नृत्य करताना दिसणार आहे. ‘झलक दिखला जा’ 5 वर्षांनंतर टीव्हीवर परतला आहे. चाहते या शोला भरभरून प्रेम देत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आहा कडकच ना! नोरा फतेहीचा मराठमोळा लूक वेधतोय सर्वांचं लक्ष, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
महेश बाबूची पत्नी नम्रताने दिवंगत सासूबाईंसाठी लिहिली भावूक पोस्ट; म्हणाली, ‘तुम्ही दिलेलं प्रेम…’

हे देखील वाचा