Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

अश्लील व्हिडिओ प्रकरणाबाबत राज कुंद्राने व्यक्त केली त्याची व्यथा, म्हणाला ‘आरोप सिद्ध होण्यापूर्वीच दोषी ठरवले’

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)चा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा याने पहिल्यांदाच अश्लील व्हिडिओ प्रकरणी आपली व्यथा मांडली आहे. त्याने या प्रकरणी अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. राज अश्लील व्हिडिओ प्रकरणात अडकल्यानंतर शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबासाठी काही महिने खूप कठीण गेले. अश्लील व्हिडिओ प्रकरणात सुमारे दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या राजने माध्यमांना आपल्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आणि या प्रकरणात हस्तक्षेप न करण्याचे आवाहन केले आहे.

अश्लील व्हिडिओ प्रकरणी राज कुंद्रांचे वक्तव्य

राजने (Raj Kundra) त्याच्या निवेदनात म्हटले आहे की, “बर्‍याच विचार विनिमयानंतर मला असे वाटले की, सर्व बेजबाबदार विधाने आणि चुकीच्या लेखांवरील माझे मौन ही माझी कमजोरी मानली जात आहे. मला असे म्हणायचे आहे की, मी माझ्या आयुष्यात कधीही ‘अश्लील व्हिडिओ’च्या निर्मितीत किंवा वितरणात सहभाग घेतला नाही. मला असे म्हणायचे आहे की, हे प्रकरण विच हंट शिवाय दुसरे काही नाही. हे प्रकरण अद्याप विचाराधीन आहे, त्यामुळे मी आत्ताच स्पष्टपणे काही सांगू शकत नाही. पण, मी खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहे.”

पुढे तो म्हणाला, “माझा भारताच्या न्यायपालिका आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, जिथे सत्याचा विजय होईल. परंतु, दुर्दैवाने माझ्यावरील आरोप सिद्ध होण्याआधीच माझे कुटुंब आणि प्रसारमाध्यमांनी मला दोषी मानले आणि माझ्या मानवी आणि घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करत दुःख दिले. लोकांमध्ये नकारात्मकता, द्वेष आणि ट्रोलिंग वाढत आहे. मी लाजेने माझा चेहरा लपवत नाही, परंतु मला असे वाटते की, मीडिया ट्रायल्सने माझ्या खाजगी आयुष्यात लक्ष देऊ नये. माझे प्राधान्य नेहमीच माझे कुटुंब राहिले आहे आणि या क्षणी माझ्यासाठी दुसरे काहीही महत्त्वाचे नाही. माझा विश्वास आहे की, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि मी सर्वांना विनंती करतो. हे विधान वाचल्याबद्दल आणि माझ्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद,” असेही राज कुंद्रा म्हणाला आहे.

राज कुंद्राला अश्लील व्हिडिओ प्रकरणी सुमारे २ महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. १९ जुलै रोजी अटक केल्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्राने या प्रकरणावर आतापर्यंत मौन बाळगले होते, त्यांनी सोशल मीडियापासूनही दुरावले होते. त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट करण्यासोबतच त्याने त्याच्या सर्व पोस्टही डिलीट केल्या आहेत.

हेही वाचा :

अशाप्रकारे शूट झाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील रोमॅंटिक सीन शूट, प्रार्थनाने केला व्हिडिओ शेअर

नवीन घराच्या बाल्कनीमध्ये रोमॅंटिक झाले कॅटरिना आणि विकी, शेअर केला क्युट फोटो

लग्नानंतर अंकिता लोखंडेने शेअर केला गृह्प्रवेशाचा व्हिडिओ, पत्नीची साडी सांभाळताना दिसला विकी 

हे देखील वाचा