Friday, April 19, 2024

राज कुंद्राचे व्हाट्सऍप चॅट आले समोर; ग्रुप ‘एच’च्या माध्यमातून व्हायचे अश्लील चित्रपटासंबंधित सर्व व्यवहार

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांच्या विरुद्ध अश्लील चित्रपट तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान राज कुंद्रा यांच्याविरोधात काही पुरावे आढळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी त्याची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली. त्यानंतर पहाटे ४ च्या सुमारास त्याला मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात आणण्यात आले होते. त्याला आज (२० जुलै) न्यायालयात देखील हजर करण्यात येणार आहे.

https://www.instagram.com/p/CHy8rzfAD1u/?utm_source=ig_web_copy_link

 

पोलिसांनी सांगितले की, राज कुंद्राने त्याच्या एका नातेवाईकांसोबत मिळून यूकेमध्ये एक कंपनी तयार केली. हीच कंपनी या चित्रपटांसाठी अनेक एजेंट तयार करते. राज कुंद्राने प्रदीप बख्शीसोबत मिळून यूकेमध्ये ‘केनेरिन प्रोडक्शन हाउस’ नावाची एक कंपनी तयार केली. यूकेमध्ये राहणारे प्रदीप या कंपनीच्या चेयरमनसोबतच राज कुंद्राचा बिजनेस पार्टनर देखील आहे. प्राप्त माहितीनुसार राज या कंपनीचा अप्रत्यक्ष मालक असून, गुंतवणूकदार देखील आहे.

 

सोबतच पोलिसांनी एका व्हाट्सअँप ग्रुपच्या चॅटिंगचा देखील खुलासा केला आहे. या ग्रुपवरूनच सर्व व्यवहार ठरवले जायचे. या ग्रुपचे नाव ‘एच अकाऊंट’ असे आहे. या ग्रुपमध्ये राज कुंद्रासोबतच प्रदीप बख्शी देखील आहे. या ग्रुपची काही चॅटिंग सध्या व्हायरल होत असून या चॅटिंगमध्ये पैशाच्या व्यवहारांवर चर्चा होत असल्याचे आपल्याला दिसेल. या चॅटिंगमध्ये रोज किती कमाई होते, पॉर्न सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रींना किती पैसे द्यायचे, बिजनेस कसा करायचा, बिजनेस कसा होत आहे आदी सर्व मुद्द्यांवर चर्चा होते.

https://www.instagram.com/p/CLqH68LgKx0/?utm_source=ig_web_copy_link

 

या अटकेनंतर राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांची नावं ट्विटरच्या टॉप ट्रेण्डमध्ये दिसू लागली आहेत. शिवाय राज कुंद्रांचे एक जुने २०१२ सालातले ट्विटही व्हायरल होत असून, यात त्याने लिहिले आहे की, “पॉर्न विरुद्ध प्रॉस्टीट्यूशनवर जर बोलू. कॅमेरासमोरच्या सेक्ससाठी म्हणजेच पॉर्न फिल्मसाठी पैसे देण्याला कायदेशीर मान्यता का देण्यात आली आहे? हे प्रॉस्टीट्यूशनपासून वेगळे कसे ठरते?”

 

राज कुंद्रावर मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे सुद्धा आरोप करण्यात आले आहे. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईतील नेरूळमधून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-आषाढी निमित्त गायक ‘जयदीप बगवाडकर’नं विठुरायाला ‘वारी नाही रे’ या गाण्याने घातली भावनिक साद

हे देखील वाचा