Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड राज कुंद्रा प्रकरण: राजची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवणी; वकिलांनी जामिनासाठी केला अर्ज

राज कुंद्रा प्रकरण: राजची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवणी; वकिलांनी जामिनासाठी केला अर्ज

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला मुंबई क्राईम ब्रांचने पॉर्न फिल्म प्रकरणी अटक करण्यात आल्याचे सर्वांनाच माहित आहे. उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज कोर्टाने राज कुंद्राला मोठा धक्का देत, अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

photocourtaesygoogle rajkundra

राज कुंद्राला १९ जुलै २०२१ रोजी मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर त्याला २० जुलै रोजी कोर्टाने ३ दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली होती. २३ जुलैला पुन्हा झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने राजच्या कोठडी २७ जुलैपर्यंत वाढ केली होती. आता पुन्हा या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

या सुनावणी वेळी राज कुंद्राच्या घरातून अनेक महत्वाचे पुरावे सापडल्याचे क्राइम ब्रांचने कोर्टाला सांगितले आहे. सोबतच त्याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे देखील जप्त करण्यात आले आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञाची मदतीने या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांमधून डेटा परत मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राजच्या घरातून हार्ड डिस्क आणि मोबाईल सापडला आहे. आयओएसवर आरोपींकडून हॉटशॉट्स दाखवले जात असताना, त्यांना ऍपल कडून १ कोटी १३ लाख ६४,८८६ रुपये मिळाले होते.

ही रक्कम कोटक महिंद्रा बँक, येस बँक आदी अनेक बँक खात्यांमध्ये आली असून, ही सर्व बँक खाती सील करण्यात आली आहे. पोलीस आता फरार आरोपींचाही शोध घेतला जात आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत राज कुंद्रा आणि रायन थारपसह अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, रायनला राजच्या या अश्लील चित्रपटांच्या रॅकेटची संपूर्ण माहिती होती. सोबतच हे व्हिडिओ मुंबई ते यूके कसे जायचे देखील सर्वाना माहित होते.

या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी चार दिवसांपूर्वी राज आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्या घरावर छापा मारला होता. या छाप्या दरम्यान राज आणि शिल्पा यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीमध्ये शिल्पाने तिचा नवरा राज निर्दोष असल्याचे सांगितले. नुकतेच राजने फेब्रुवारीमध्ये या प्रकरणातील खुलाशानंतर त्यांचा फोन सुद्धा बदल्याचे सांगितले जात आहे.

राज कुंद्राच्या विरोधात आयपीसीच्या ४२० (फसवणूक), ३४ (कॉमन इंटेशन), २९२, २९३ (अश्लिलता पसरवणे), आणि आयटी कायद्याअंतर्गंत कलम ६७ अ अंतर्गंत केस दाखल करण्यात आल्या आहेत. राजच्याविरोधात याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात पॉर्नोग्राफीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात कोर्टामध्ये चार हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केआरकेवर एका फिटनेस मॉडेलने लावला बलात्काराचा आरोप; मुंबईमध्ये झाली तक्रार दाखल

-‘ती माझा जीव घेईल…’, जेव्हा करीना कपूरबाबत बोलताना सैफ अली खानने केला होता त्या गोष्टीचा खुलासा

-‘त्यांना मला नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये बघायला आवडते’, करीनाने सांगितले सासू शर्मिला टागोरसोबतच्या बॉन्डबद्दल

हे देखील वाचा