Wednesday, June 11, 2025
Home बॉलीवूड ‘तोंड लपवण्याची वेळ यावी असे काम का करावे’, म्हणत नेटकऱ्यांनी केले ‘या’ अभिनेत्रींच्या नवऱ्याला ट्रोल

‘तोंड लपवण्याची वेळ यावी असे काम का करावे’, म्हणत नेटकऱ्यांनी केले ‘या’ अभिनेत्रींच्या नवऱ्याला ट्रोल

नाव, प्रसिद्धी आणि ग्लॅमरसाठी प्रसिद्ध असलेल्या चित्रपट उद्योगात फॅशन महत्त्वाची भूमिका बजावते. फॅशनच्या वाढत्या क्रेझमध्ये, गॅलमरच्या जगात असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या अतरंगी स्टाइलसाठी ओळखले जातात. रणवीर सिंगपासून ते उर्फी जावेदपर्यंत हे कलाकार अनेकदा त्यांच्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असतात. दरम्यान, अलीकडे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj kundra) देखील अशाच एका विचित्र फॅशनमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी खूप चर्चेत आलेल्या राज कुंद्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे त्याला जोरदार ट्रोल केल जात आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सध्या राज कुंद्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये राज कुंद्राने काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दिसत आहे. यासोबतच राजने चष्माही लावलेला दिसत आहे. पण खास गोष्ट म्हणजे या जॅकेटने त्याने आपला संपूर्ण चेहरा झाकला आहे त्यामुळे त्याचा चेहरा कोणीही पाहू शकत नव्हता. व्हिडिओमध्ये राज कुंद्राला पाहून तो शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा आहे हे ओळखणे कठीण झाले. आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

राज कुंद्राचा हा व्हिडिओ एका अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून, नेटिझन्स पुन्हा एकदा राज कुंद्रा आणि त्याच्या अश्लील प्रकरणाबद्दल बोलताना दिसत आहेत. राजच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने “अस काम का करता की तोंड लपवण्याची वेळ येईल” असे म्हणत टीका केली आहे. तर दुसर्‍या युजरने लिहिले की, “चेहरा दाखवणे योग्य नाही.” तर आणखी एका युजरने कमेंट करत असे “जर तुम्ही असे कृत्य केले तर तुमचा चेहरा लपवावा लागेल.” अशा कडक शब्दात राज कुंद्राला धारेवर धरले आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. राज कुंद्राच्या व्हिडीओवर कमेंट करताना आणखी एका युजरने लिहिले की, “जर चेहरा दाखविण्या लायक नसेल तर अशीच एंट्री करावी लागेल.” असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा गेल्या वर्षी चर्चेत आला  होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलै २०२१ रोजी अश्लील चित्रपट बनवून प्रसारित केल्याबद्दल ताब्यात घेतले होते. यावेळी राज कुंद्राने गेल्या दीड वर्षात 100 हून अधिक अश्लील चित्रपट बनवल्याचे समोर आले. जूनमध्ये सुमारे 2 महिने या प्रकरणात बंद राहिल्यानंतर राज कुंद्राला सप्टेंबरमध्ये जामीन मिळाला होता. या सगळया प्रकरणाची देशभर चर्चा रंगली होती.

        दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा