Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडच्या पहिल्या सुपरस्टारचा मूळ स्वभाव होता तरी कसा? सहकलाकारांनी सांगितलंय सत्य

बॉलिवूडच्या पहिल्या सुपरस्टारचा मूळ स्वभाव होता तरी कसा? सहकलाकारांनी सांगितलंय सत्य

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते होऊन गेले ज्यांच्या अभिनयाचे असंख्य चाहते आपल्याला आजही पाहायला मिळतात. या अभिनेत्यांचा दमदार अभिनय चित्रपट जगतात अजरामर झाला. अशा दिग्गज अभिनेत्यांमध्ये राजेश खन्ना यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. राजेश खन्ना हे हिंदी चित्रपट जगतातील देखणे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक दशके चित्रपट जगतावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. चित्रपटात रोमँटिक भूमिका करणाऱ्या राजेश खन्नांचा मुळ स्वभाव मात्र अगदीच वेगळा होता. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांनी राजेश खन्ना यांच्या स्वभावाचे अनेक पैलु सांगितले होते. काय म्हणाले होते हे कलाकार चला जाणून घेऊ. 

राजेश खन्ना(Rajesh Khanna) हे नाव हिंदी चित्रपट जगतात कायमचे अजरामर झाले ते त्यांच्या अभिनयामुळे आणि लोकप्रियतेमुळे. इतकी लोकप्रियता आणि स्टारडम खूप कमी कलाकारांना अनुभवायला मिळतो. त्यांनी आपल्या करिअरमध्ये आनंद, कसम, आराधना, अमर प्रेम, दाग, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले होते. आज ते या जगात नसले तरी त्यांच्या चित्रपटांची चर्चा नेहमीच होत असते. पडद्यावर नेहमी गंभीर असणाऱ्या राजेश खन्ना यांचा मुळ स्वभाव खूपच वेगळा होता. त्यांनी आपली  चित्रपटातील रोमँटिक प्रतिमा कायम ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केला होता. त्यामुळेच ते कधीच एक्शन चित्रपटात काम केले नाही.

rajesh khanna
Photo Courtesy: Instagram/rajeshkhanna_first_superstar

त्यांच्या याच सवईबद्दल बोलताना प्रसिद्ध अभिनेते प्रेम चोप्रा म्हणाले की, “बदलत्या काळासोबत स्वतःमध्येही बदल केला नाही ते त्यांच्याच यशात मग्न राहिले,” असे मत राजेश खन्ना यांच्याबद्दल व्यक्त केले होते. त्याचबरोबर राजेश खन्ना यांच्यासोबत काम केलेल्या ज्युनिअर महमूद यांनी त्यांच्याबद्दल सांगताना “ते सेटवर कधीही जास्त बोलत नव्हते तसेच ते नवीन कलाकारांकडे अजिबात लक्ष देत नव्हते” असा खुलासा केला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, महमूद यांनी राजेश खन्ना यांच्या आठवणी सांगताना काका सेटवर नेहमी एकटेच बसलेले असायचे असे म्हटले होते. त्याचबरोबर राजेश खन्ना यांच्यासोबत ९ चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री मुमताजनेही त्यांच्या आठवणी सांगताना राजेश खूपच एकटे राहायचे. मात्र ते ज्यांना आपले मानायचे त्यांच्याशी ते खूप बोलायचे असा खुलासा केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

तर ‘या’ कारणामुळे जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख राहिल्या अजूनही अविवाहित, स्वतःच केला खुलासा

‘तोंड लपवण्याची वेळ यावी असे काम का करावे’, म्हणत नेटकऱ्यांनी केले ‘या’ अभिनेत्रींच्या नवऱ्याला ट्रोल

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे कौतुक करताना कंगनाने पुन्हा साधला आलिया भट्टवर निशाणा

हे देखील वाचा