नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ मधील ‘शालू’ म्हणजेच राजेश्वरी खरात आजकाल खूपच लाईमलाईटमध्ये राहते. ‘फँड्री’ मध्ये जब्या आणि शालूची प्रेमकथा इतकी प्रचंड गाजली की, त्याने राजेश्वरीला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. आज ती तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तरुणमंडळी शालूसाठी अक्षरशः वेडी आहे. मात्र नुकताच समोर आलेला व्हिडिओ पाहून, तिच्या चाहत्यांचं हृदय तुटलं आहे, असं त्यांच्या कमेंट्स वाचून वाटत आहे.
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिची फॅन फॉलोविंग देखील तगडी आहे. म्हणूनच की काय, तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात. चाहत्यांकडून तिचे व्हिडिओ मोठ्या आवडीने पाहिले जातात. नुकताच तिने शेअर केलेला व्हिडिओ पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.
राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती ‘अकेला है मिस्टर खिलाडी’ या हिंदी गाण्यावर अभिनय करताना दिसत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, शालूने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यातील तिचे मूव्ह्ज आणि चेहऱ्यावरील हावभाव सर्वकाही अतिशय परफेक्ट आहे. मात्र यामध्ये तिच्यासोबत एक मुलगाही दिसत आहे. कदाचित यामुळेच तिच्या चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. पण तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “मिस्टर खिलाडी येण्यासाठी अजून वेळ आहे!”
गेल्या काही दिवसांपासून राजेश्वरी सतत तिचे डान्स व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडूनही खूप पसंत केले जाते. नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ देखील त्यांना चांगलाच भावला आहे. व्हिडिओ शेअर होता क्षणीच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली. काही वेळापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला ८ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केलं आहे. सोबतच नेटकरी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…